गोध्रा हत्याकांड : गुजरात हायकोर्टानं 11 जणांची फाशी जन्मठेपेत बदलली

गोध्रा हत्याकांड : गुजरात हायकोर्टानं 11 जणांची फाशी जन्मठेपेत बदलली

गोध्रा हत्याकांड प्रकरणात गुजरात हायकोर्टाचा निर्णय आलाय. 11 जणांच्या फाशीला जन्मठेपेत बदलण्यात आलंय. निर्णय देताना कोर्टानं तत्कालीन गुजरात सरकारवरही ताशेरे ओढलेत.

  • Share this:

09 आॅक्टोबर : गोध्रा हत्याकांड प्रकरणात गुजरात हायकोर्टाचा निर्णय आलाय. 11 जणांच्या फाशीला जन्मठेपेत बदलण्यात आलंय. निर्णय देताना कोर्टानं तत्कालीन गुजरात सरकारवरही ताशेरे ओढलेत.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकारला अपयश आलं, असे कोरडे कोर्टानं ओढलेत. सरकारनं कार सेवकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेशही कोर्टानं दिलेत.

27 फेब्रुवारी 2002 साली गोध्रा हत्याकांड झाले होते. साबरमती एक्स्प्रेसच्या 'एस-6' डब्याला 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात 59 प्रवासी होते व त्यातील बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते.

याप्रकरणी एसआयटी कोर्टाने 1 मार्च 2011 रोजी 31 जणांना दोषी ठरवण्यात आले होते तर 63 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. तसेच 11 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती.

या 11 दोषींना फाशीऐवजी जन्मठेप

1) बिलाल इस्माइल उर्फ हाजी बिलाल

2) अब्दुल रझाक कुरकरु

3) रामझानी बिनयामीन बेहरा

4) हसन अहमद चरखा

5) जाबीर बिनयामीन बहेरा

6) महेबूब चंदा

7) सलीम युसूफ जर्दा

8) सिराझ मोहम्मद मेडा

9) इरफान कलंदर

10) इरफान पातलिया

11) महेबूब हसन लतिको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading