नवी दिल्ली, 23 जून : सध्या देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वच क्षेत्राला याचा फटका सहन करावा लागत आहे. शिक्षण क्षेत्रातही कोरोनाचा परिणाम लक्षात घेता अनेक बदल करावे लागत आहे. CBSE च्या बोर्डाच्या परीक्षांबाबत सरकार उद्या सायंकाळपर्यत निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाच्या शिल्लक राहिलेल्या परीक्षा जुलैमध्ये घेणार की परीक्षा रद्द करुन internal assessment नुसार गुण दिले जाणार याबाबत सरकारला निश्चित करावयाचे आहे.
केंद्र सरकार आणि CBSE तर्फे आज सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितले की बोर्डाच्या शिल्लक परीक्षा (Papers) बाबत अद्याप तज्ज्ञ चर्चा करीत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील सुनावणी गुरुवारी 2 वाजेपर्यंत ढकलण्यात आली.
हे वाचा-ALERT! हॅकर्सनी शोधला नवा मार्ग, कोणतीही वेबसाइट उघडल्यास फोन हॅक होण्याचा धोका
CBSE बारावीच्या शिल्लक राहिलेल्या परीक्षा जुलैमध्ये घेऊ इच्छिते. मात्र काहींनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत आहे. त्यांचं म्हणणं आहे की कोरोनाच्या संकटात मुलं परीक्षा केंद्रात सुरक्षित नसतील, यामुळे इंटरनेट एसेसमेंटर करुन मुलांना गुण दिले जावे. सर्वोच्च न्यायालयाने यावर सरकारचा सल्ला मागितला आहे. सरकार आपला सल्ला गुरुवारी कोर्टात सादर करेल. त्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील.
संपादन - मीनल गांगुर्डे