• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कौतुकास्पद! सरकारी कंपनीने कर्मचाऱ्याच्या मुलीच्या उपचारासाठी दिले तब्बल 16 कोटी

कौतुकास्पद! सरकारी कंपनीने कर्मचाऱ्याच्या मुलीच्या उपचारासाठी दिले तब्बल 16 कोटी

या कंपनीने आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीच्या उपचारासाठी 16 कोटी रुपये दिले आहेत.

 • Share this:
  कोरबा, 20 नोव्हेंबर : छत्तीसगडच्या (Chhattisgarh News) कोरबा जिल्ह्यातील साउथ ईस्टन कोलफील्ड्स लिमिटेडने (SECL) आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीच्या उपचारासाठी 16 कोटी रुपये दिले आहेत. एसइसीएलच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. कंपनीने कर्मचाऱ्याच्या 2 वर्षांच्या मुलीवर उपचारासाठी 16 कोटी रुपये दिले आहेत. कर्मचाऱ्याला शुक्रवारी या रकमेचा चेक देण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दीपका कोयला भागातील कार्यरत ओव्हरमॅन सतीश कुमार रवी यांची मुलगी सृष्टी ‘स्पाइनल मस्क्यूलर एट्रॉफी' (SMA) नावाच्या अत्यंत दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. लहान मुलांमध्ये होणारा हा आजार मणक्याचा कणा आणि ब्रेन स्टेममधील असून यामुळे मुलाचा जीवही जाऊ शकतो. यावरील उपचार खूपर महाग आहे. आणि उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन ‘जोलजेन्स्मा' ची किमत 16 कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आता कोल इंडियाने आपल्या कुटुंबातील मुलीवर उपचारासाठी 16 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. शुक्रवारी सृष्टी रानीचे वडील सतीश कुमारला 16 कोटी रुपयांचा चेक दिला आहे. त्यांनी सांगितलं की, सतीशजवळ पैशांची कमी होती आणि आपल्या मुलीवरील उपचारासाठी इतकी महागडी रक्कम जमा करणं शक्य होत नव्हतं. हे ही वाचा-ऐन लग्नसराईतच वाढणार रेडिमेड कपड्यांचे दर,5 टक्क्यांवरुन वाढून 12% होणार GST दर एसईसीएलच्या या पुढाकारामुळे कंपनीचं कौतुक केलं जात आहे. जेव्हा देशभरात कोल इंडिया आणि त्याच्या संबंधिक कंपनीतील कार्यरत कर्मचारी वीज निर्मितीसाठी कोळशाच्या वाढत्या मागणी पाहता दिवस-रात्र काम करीत आहेत. एसइसीएलद्वारा मुलीवरील उपचारासाठी 16 कोटी रुपये देण्याचं मान्य केल्यानंतर खासदार जोत्स्ना महंत यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: