Home /News /national /

जंगलातील ‘सोन्याचा’ केला ब्रँड; एका छोट्या गावातील 10 तरुणींची धाडसी कथा

जंगलातील ‘सोन्याचा’ केला ब्रँड; एका छोट्या गावातील 10 तरुणींची धाडसी कथा

यश मिळविण्यासाठी फक्त पैसे असून उपयोग नाही तर त्यासाठी जिद्द आणि अपार मेहनत आवश्यक असते

    धमतरी, 19 जुलै : यश मिळवणं हे आपले कष्ट आणि व्यासंगावर अवलंबून असतं. गावात अत्यंत कमी साधनांचा वापर करीत या तरुणींनी धाडसी काम करुन दाखवलं आहे. कदाचित याचा आपण विचारही करू शकणार नाही. दुगलीचं मध...दुगलीचा आवळा...दुगलीचा अलोविरा...ही नावं आता छत्तीसगडमध्ये प्रसिद्ध झाली आहे. 2009-10 मध्ये या गावातील 10 तरुणींनी वन विभागाच्या मदतीने 10 लाख रुपयांचं कर्ज घेऊन जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला. आज जागृती स्वयं सहाय्यत समूहच्या या 10 जणी लाखोंने कमवत आहे. दररोज किमान 10 तासांची मेहनत करुन ते जंगलातील वस्तूंचा ब्रँड सुरू केला आहे. वर्षाला 4 लाखांची कमाई 10 तरुणींचा हा समूह दररोज 4 लाखांपर्यंत कमाई करीत आहे. येथील आवळा कँडी असोवा तिखूर सर्वात राज्यात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे सर्व पदार्थांची गुणवत्ता कसूभरही कमी होऊ दिली नसून याकारणाने अनेकदा लोक वस्तू खरेदी करण्यासाठी गावी येतात. हे वाचा-VIDEO : चिकन नव्हे तर या डॉलीला आवडते पाणीपुरी; कशी खातेय बघा... बचतगटाच्या मुलींची मेहनत पाहून वन विभाग त्यांना बरीच मदत करत आहे. कर्ज मिळणे किंवा कच्चा माल खरेदी करणे किंवा त्यांचे प्रशिक्षण घेणे याविषयी काहीही असो, विभाग त्यांना नेहमीच मदत करण्यास तयार असतो. धमतरी वनविभागाचे डीएफओ अमिताभ वाजपेयी म्हणाले की- विभागीय पाठबळाच्या सहाय्याने मुलींचे यश नक्की झालं आहे. वन विभाग लवकरच मध उत्पादनासाठी फूड लायसन्स घेणार आहे, ज्यामध्ये हा गटही सामील होणार आहे. त्यांनी सांगितले की, जागृती समूहाने संपूर्ण क्षेत्रात रोजगाराची मोठी लाट तयारी केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या