खगड़िया, 1 ऑक्टोबर : बिहारमधून अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. देवरी गावात राहणारी एक गर्भवती महिला (Pregnant Woman) किरण देवी हिला अचानक गर्भकळा सुरू झाल्या. त्यानंतर रुग्णालयात जात असतानाच त्या महिलेने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर तातडीने महिलेच्या कुटुंबीयांनी तिला जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी महिलेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. यानंतर महिला डॉक्टरने महिलेच्या कुटुंबीयांकडून शस्त्रक्रिया करण्याची फी मागितली. यासाठी डॉक्टरांनी 7 हजार रुपयांची मागणी केली. मात्र महिला ही अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. इतके पैसे नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
या प्रकरणानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयाचे 7000 रुपयांचे बिल भरू न शकल्याने महिला डॉक्टरने दहा हजार रुपये देऊन बाळाचा व्यवहार करण्याचे सांगितले. यानंतर महिलेला 7 हजार रुपये देऊन एका कागदावर या व्यवहाराबद्दल लिहून स्वत:कडे ठेवलं. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी राग व्यक्त केला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांनीही तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गावकऱ्यांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घालताच महिला डॉक्टरांनी बाळाला कुटुंबीयांकडे दिलं.
हे ही वाचा-COVID: राज्यात रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट नाही, दिवसभरात गेला 394 जणांचा बळी
डॉक्टर म्हणाल्या..
खासगी रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी सांगितले की, महिला खूप गरीब आहे. तिच्याकडे रुग्णालयाचं बिल भरण्यासाठीदेखील पैसे नव्हते. त्यामुळे 10 हजार रुपयात बाळाला गरजूला देण्यास सांगितलं. मात्र सकाळ होताच महिला च्या कुटुंबीयांनी गोंधळ घातला. यानंतर बाळाला कुटुंबाकडे सुपूर्द केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Private hospitals