सही किया! छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना विद्यार्थिनींनीच दिला चोप; गावकऱ्यांनीही शिकवला धडा

सही किया! छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना विद्यार्थिनींनीच दिला चोप; गावकऱ्यांनीही शिकवला धडा

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेडछाड काढणाऱ्या 2 रोडरोमियोंना विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिलाय. तर गावकऱ्यांनी या दोघांचं मुंडण केलं.

  • Share this:

सोनिपत (हरियाणा), 14 फेब्रुवारी -  शाळेत जाणाऱ्या मुलींच्या मागे लागत छेड काढणाऱ्या 2 रोडरोमियोंना त्यांच्या या कामाची मोठी किंमत मोजावी लागली. विद्यार्थिनींची छेडछाड (Eve teasing) काढणं चांगलंच महागात पडलं. हे रोडरोमियो रोज शाळेजवळ उभं राहून जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थिनींची (School students) छेडछाड करत होते. त्यामुळे या विद्यार्थिनी खूप त्रासल्या होत्या. Valentine's Week मध्ये तर या गुंडांची छेडछाड आणखी वाढली. गुरुवारीसुद्धा रोडरोमियोंनी या विद्यार्थिनींची छेड काढली. मात्र यावेळी त्या विद्यार्थिनींचा संयम सुटला. या सगळ्या विद्यार्थिनींनी हिम्मत करत एकत्र आल्या आणि दोन रोडरोमियोंचा चांगलाच चोप दिला. हा सगळा प्रकार घडत असताना गावकरीही लगेच तिथे पोहोचले आणि त्यांनीही या रोडरोमियोंची धुलाई करायला सुरुवात केली. दरम्यान घटनास्थळी मोठी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली. जोरदार धुलाई केल्यानंतर गावकऱ्यांनी या रोडरोमियोंचं मुंडणही केलं.

हरियाणात  सोनिपत जिल्ह्यातील राई परिसरातील एका हायस्कूलमध्ये शिकण्यासाठी आजुबाजूच्या गावातील अनेक विद्यार्थी येतात. त्या गावात शाळा नसल्यानं या विद्यार्थ्यांना शेजारील गावात यावं लागतं. मात्र शाळेत जात असतानाच नेहमीच शेजारील गावातले दोन तरुण या विद्यार्थिनींची छेडछाड करत होते. मात्र गुरूवारी या विद्यार्थिनींनी आपला राग बाहेर काढला.

विद्यार्थिनींनी अनेकदा दिली होती ताकीद

विद्यार्थिनी जेव्हा शाळा सुटल्यानंतर घरी जायला निघत होता तेव्हा काही अंतर पुढे गेल्यावर हे रोडरोमियो या विद्यार्थिनींचा पाठलाग सुरू करत होते. त्यांची छेडछाड करत अश्लील शेरेबाजीही करत होते. रोजच्याच या छेडछाडीमुळे या मुली त्रस्त झाल्या होत्या. त्यांनी वारंवार या रोडरोमियोंना असं वागणं बंद करण्याची ताकीदही दिली होती.

रोडरोमियोंची दुष्कृत्यं थांबली नाहीत

रोडरोमियो आपले कारनामे काही थांबवायला तयारी नव्हते. या विद्यार्थिनींची छेडछाड करणं सुरूच होतं. गुरूवारी मात्र या विद्यार्थिनींनी त्रस्त होत धाडस केलं आणि या दोन्ही भामट्यांना पकडलं आणि त्यांची यथेच्छ धुलाई केली. त्याचवेळी तिथून जात असलेल्या गावकऱ्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. आणि त्या तरुणांना पकडलं आणि त्यांचं मुंडण केलं.

त्याचवेळी तिथे जमलेल्या काहींनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरलही केला. या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने या तरुणांना चोप दिलाय आणि त्यांची धुलाई केलीय हे स्पष्ट दिसत आहे. हे तरुण गावकऱ्यांच्या तावडीत सापडल्यानंतर जोपर्यंत त्यांचा चोप आणि धुलाई सुरू होती तोपर्यंत ते दोघेही सगळ्यांची वारंवार माफी मागत होते.

Valentines च्या निमित्ताने विद्यार्थीनींनी घेतली प्रेम विवाह न करण्याची शपथ

रोहित पवारांचा 'Happy Valentines Day' मध्येही टोला, शेअर केलेल्या मेसेजची चर्चा

 

 

First published: February 14, 2020, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading