वाजत-गाजत निघाली शेतकऱ्याच्या कुत्रीची अंत्ययात्रा; तेराव्यात अख्ख्या गावाने व्यक्त केला शोक

वाजत-गाजत निघाली शेतकऱ्याच्या कुत्रीची अंत्ययात्रा; तेराव्यात अख्ख्या गावाने व्यक्त केला शोक

आतापर्यंत कोणीही आपल्या कुत्रीसाठी इतकं केलं नसले, यावर शेतकरी म्हणतो.. 'मग तो माणूस असो वा प्राणी..कोणा प्रती असलेलं प्रेम मोजलं जाऊ शकत नाही'

  • Share this:

लखनऊ, 17 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील मेरठमधील बाढम गावात एका शेतकऱ्याने एका अनोख्या तेराव्याच्या जेवनाचे आयोजन केले होते. हे कोणा माणसाच्या मृत्यूनंतर नाही तर आपल्या लाडक्या कुत्रीच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानी तेराव्या कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या कुत्रीचं नाव पुष्पा असं होतं. शुक्रवारी पुष्पाच्या आठवणीत संपूर्ण गावाला जेवू घातलं होतं. गावात तेराव्याच्या कार्डचंही वाटप करण्यात आलं होतं. शेतकरी योगेश त्यागीचं आपल्या पुष्पावर खूप प्रेम होतं. त्यांनी स्नशानभूमीत हिंदू पद्धतीप्रमाणे ढोल वाजवित तिच्यावर अत्यंसंस्कार केले. पुष्पाच्या अस्थी बृजघाटात विसर्जित करण्यात आले. हो तेराव्याचं जेवण इतर गावांमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे.

बाढम गावात राहणारे योगेश त्यागी व्यवसायाने शेतकरी आहे. योगेश यांची पाळीव कुत्री पुष्पा हिचं गेल्या 12 ऑक्टोबर रोजी निधन झालं. 6 वर्षांपासून या घरात राहणारी पुष्पा कुटुंबातील सदस्यांपैकी एक होती. त्यामुळे योगेश यांनी पुष्पाच्या मृत्यूनंतर तिचा अंत्यसंस्कारही घरातील एका सदस्याप्रमाणेच केला. योगेश आणि भागातील अन्य गावकऱ्यांसह ढोल वाजवित पुष्पाची शवयात्रा काढण्यात आली.

हे ही वाचा-अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीला अपघात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

13 ब्राम्हणांना ब्रम्हभोज आणि दक्षिणाही..

योगेशच्या कुटुंबीयांनी या दु:खाच्या क्षणात सहभागी झालेल्यांना धन्यवाद दिले. योगेशने पुष्पाच्या तेराव्यासाठी कार्डही छापले होते. शुक्रवारी पुष्पा यांच्या तेराव्याची दिवशी योगेश यांच्या घरात सकाळी शांतीयज्ञाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कुटुंबीयांच्या सदस्यांसह गावातील अन्य लोकांनी आहुती देत पुष्पाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. शांतीयज्ञ केल्यानंतर हिंदू पद्धतीप्रमाणे 13 ब्राम्हणांना ब्रम्हभोज करीत त्यांना दक्षिणा देण्यात आली.

तेराव्याला खीर-पुरीचं जेवण

या अनोख्या तेराव्याला शेकडो गावकरी सहभागी झाले होते. तेराव्याच्या जेवणात योगेश आणि कुटुंबीयांनी बटाट्याची भाजी, पुरी, खीर आणि सलाद ठेवलं होतं. याबाबत योगेश त्यागी म्हणतात, 'मग तो माणूस असो वा प्राणी..कोणा प्रती असलेलं प्रेम मोजलं जाऊ शकत नाही'

Published by: Meenal Gangurde
First published: October 17, 2020, 8:41 AM IST

ताज्या बातम्या