VIDEO: सगळ्यात विषारी कोब्रा नागाला वनाधिकाऱ्याने पाजलं पाणी आणि काय झालं ते पाहाच!

VIDEO: सगळ्यात विषारी कोब्रा नागाला वनाधिकाऱ्याने पाजलं पाणी आणि काय झालं ते पाहाच!

त्या अधिकाऱ्याने त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र नागाला त्या पाण्याच्या बाटली जवळ काही जाता येत नव्हतं तेव्हा धाडसाने त्या अधिकाऱ्याने त्याच्या फण्याला आधार दिला.

  • Share this:

रायपूर 23 मे: देशात कोरोनाचं थैमान सुरू असताना आता उन्हाचा कहरही सुरू झाला आहे. तापमानात दररोज वाढ होत आहे. पारा 45 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. अंगाची लाही लाही होत आहे. शहरांमध्ये दुपारी लोक घराबाहेर पडत नाहीत. अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर जंगलांमध्येही पाणीसाठी आटल्याने प्रण्यांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावं लागतं. जगात काम करणारे वनाधिकारी आपल्या पद्धतीने प्राण्यांची काळजी घेत आहेत. असाच एक धाडसी वनाधिकारी जंगलात विषारी असणाऱ्या कोब्रा नागाला पाणी पाजतानाता व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

छत्तिसगडचे IAS अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. कायम जंगलात भटकंती करणाऱ्या या अधिकाऱ्याला हा नाग दिसला. तो पाण्याच्या शोधात भटकत असल्याचं त्यांनी ओळखलं. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेली पाण्याची बॉटल काढली आणि त्याला ते पाणी पाजण्याचा प्रयत्न करू लागले.

सगळेच जंगली प्राणी हे अतिशय चाणाक्षपणे समोर काय आहे हे ओळखतात असं म्हटलं जातं. हे अधिकारी जेव्हा त्या नागाजवळ गेले त्यावेळी तो काही प्रतिसादच देत नव्हता. त्याच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्याला धोका नाही तेव्हा तो एकाच ठिकाणी थांबला.

त्या अधिकाऱ्याने त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र नागाला त्या पाण्याच्या बाटली जवळ काही जाता येत नव्हतं तेव्हा धाडसाने त्या अधिकाऱ्याने त्याच्या फण्याला आधार दिला. तेव्हा त्या नागाच्या तोंडात पाणी जाऊ लागलं आणि मग त्याने पाणी घेतलं

कोरोनाला दूर ठेवायचं असेल तर या 5 गोष्टी नियमित करा, तज्ज्ञांनी दिला सल्ला

प्राण्यांना जेव्हा धोका दिसतो तेव्हाच ते हल्ला करतात असं निरिक्षण अनेक प्राणी तज्ज्ञांनी नोंदवलेलं आहे. त्यामुळे त्या नागाला पाहिजे असलेलं पाणी हा अधिकारी देत असल्याने त्याने हल्ल्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. त्याचबरोबर तो अधिकारीही कायम जंगलात भटकंती करत असल्याने त्यालाही प्राणी आणि सापांचा अभ्यास होता.

त्यामुळे समान्य लोकांनी कदापीही असं धाडस करू नये असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. कारण योग्य माहिती आणि प्रशिक्षण असल्याशीवाय अशी कृती करणं हे धोकादायक ठरू शकतं.

मात्र या वनाधिकाऱ्याच्या कामाचं कौतुक सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 05:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading