News18 Lokmat

मुरबाडमध्ये देशातील पहिलं आजी-आजोबा संमेलन

मुरबाडमध्ये देशातील पहिलं आजी-आजोबा संमेलन भरवण्यात आलं आहे. आजीबाईंच्या शाळेची संकल्पना यशस्वी झाल्यानंतर हे आजी-आजोबांचं पहिले संमेलन भरवण्यात आलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 2, 2018 09:56 AM IST

मुरबाडमध्ये देशातील पहिलं आजी-आजोबा संमेलन

02 मे : मुरबाडमध्ये देशातील पहिलं आजी-आजोबा संमेलन भरवण्यात आलं आहे. आजीबाईंच्या शाळेची संकल्पना यशस्वी झाल्यानंतर हे आजी-आजोबांचं पहिले संमेलन भरवण्यात आलं आहे. या संमेलनाचं विशिष्ट म्हणजे गणवेशात आलेले आजी आजोबा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

या संमेलनात 'आजीबाईंचा बटवा' या सदरामध्ये ग्रामीण भागातील 50 पेक्षा अधिक वन औषधींची ओळख आजी आजोबांना करून देण्याकरिता दुर्मिळ वन औषधींचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यामुळे शाळा जरी असली तर त्या अभ्यासासोबत अवघा निसर्गच आला होता असं म्हणायला हरकत नाही. सध्याच्या काळात नैसर्गिक वनस्पतींचं महत्त्व कमी होत असताना आजी-आजोबांचा हा बटवा आणि त्यातल्या वनस्पती सगळ्यांनाच नव्याने माहिती देण्यासाठी आल्या होत्या.

या संमेलनात अॅलोपथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आजी-आजोबांच्या आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली. या संमेलनात जिल्ह्यातील शेकडो आजी-आजोबा मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते .आजीबाईची शाळा सुरु करणाऱ्या योगेंद्र बांगर यांनी या आजी आजोबांच्या संमेलनाचे आयोजन केले होते.

जेष्ठ नागरिक हे तरुणांच्या विचारांची सावली आहे तिला दूर सारू नका अशी अपेक्षा जेष्ठ नागिकांनी या संमेलनात व्यक्त केली. ष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यामंत्र्यांनी लक्ष द्यावे अशीही इच्छा यावेळी आलेल्या आजोबानी बोलून दाखवली.

मुरबाडच्या कुणबी समाज उन्नत्ती मंडळाच्या सभागृहात संपूर्ण दिवस हे संमेलन रंगले होते. पूर्ण आयुष्य काबाडकष्ट करून थकलेल्या या हातांना आजीबाईची शाळा, संमेलन आणि त्याच्यासाठी राबवल्या जात असलेल्या अशा विविध या कार्यक्रमांनी जगण्याची नवी उमेद मिळते आहे.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...