अखेर भारतासमोर झुकला चीन, 30 वर्षात पहिल्यांदाच केली या मालाची आयात

अखेर भारतासमोर झुकला चीन, 30 वर्षात पहिल्यांदाच केली या मालाची आयात

लडाख सीमेवर तणाव (Ladakh Border Issue) असताना भारताने चीन विरुद्ध (India-China Rift) अनेक निर्णय घेतले आहेत. चिनी APPsवर बंदी घातली आणि लोकांच्या विरोधामुळे दिवाळीत होणारी चिनी वस्तूंची यावर्षी झाली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 02 डिसेंबर: लडाख सीमेवर तणाव (Ladakh Border Issue) असताना भारताने चीन विरुद्ध (India-China Rift) अनेक निर्णय घेतले आहेत. चिनी APPsवर बंदी घातली आणि लोकांच्या विरोधामुळे दिवाळीत होणारी चिनी वस्तूंची यावर्षी झाली नाही. त्यामुळे चीनला 40 हजार कोटींचा फटका बसला होता. हा तणाव कायम असताना चीनने गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतातून तांदूळ आयात केला आहे. आत्तापर्यंत भारतातल्या तांदूळाचा दर्जा उत्तम नसल्याचं कारण देत चीन आयात करत नव्हता मात्र शेवटी चीनचा भारताकडून तांदूळ आयात (Rice Importer) करावाच लागला आहे.

चीन हा जगातला सर्वात मोठा तांदूळ आयात करणारा तर भारत हा पहिल्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. मात्र चीन भारत सोडून पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम यासारख्या देशांमधून तब्बल 40 लाख टन तांदूळ आयातो करतो. मात्र यावर्षी या देशांमध्ये पुरेसा तांदूळ उपलब्ध नाही. त्याच बरोबर भावही जास्त असल्याने चीनने भारताकडून 1 लाख टन तुकडा तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. 300 डॉलर प्रतिटन असा भारताचा भाव आहे.

दरम्यान, भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या 8व्या फेरीत यासंबधीच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य होतं त्याच ठिकाणी पुन्हा सैनिक परतणार आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

जगातील सर्वात मोठ्या व्यापार करारामध्ये भारत का नाही झाला सामील?

कुठल्याही परिस्थित दबावाला बळी पडणार नाही असं भारताने दाखवून दिलं आहे. एवढच नाही तर आक्रमकपणे सीमेवर सज्जताही सुरू केली होती. त्याचामोठा दणका चीनला बसला आहे. भारताशी संघर्ष परवडणारा नाही हे लक्षात आल्याने चीनने आपलं सैन्य मागे हटवण्याची तयारी दाखवली. 6 नोव्हेंबरला चुशूल इथं दोन्ही देशांच्या कमांडर स्तरावरच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात तोडग्यावर सहमती झाल्याचं सांगितलं जात आहे. तीन टप्प्यात यासंबंधात कार्यवाही होणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 2, 2020, 7:53 PM IST

ताज्या बातम्या