Home /News /national /

Central Vista First Look Video: नवीन संसद भवन कसं असेल?, घ्या जाणून

Central Vista First Look Video: नवीन संसद भवन कसं असेल?, घ्या जाणून

Central Vista

Central Vista

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारत स्वतःची संसद बांधणार (Central Vista project)आहे. ब्रिटिश काळापासून भारताचा राज्यकारभार ज्या संसद भवनातून चालत होता त्या संसदेला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारत स्वतःची संसद बांधणार (Central Vista project)आहे. ब्रिटिश काळापासून भारताचा राज्यकारभार ज्या संसद भवनातून चालत होता त्या संसदेला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. टाटा प्रोजेक्ट्स नवीन संसद भवन बांधत आहे. वर्षभरात सुमारे 40 टक्के काम झाले आहे. नवीन संसद भवन पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक असेल आणि अद्यावत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित काम होईल. एकूण 64 हजार 500 चौरस मीटरमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम (Central Vista Avenue) सुरू आहे. ही इमारत 4 मजली असेल. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये नवीन संसद कसं असेल याची झलक पाहायला मिळत आहे. 1.10 लाख स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेले लाल ग्रॅनाइटचे दगडी फुटपाथ आणिगार्डन एरिया, राजपथावर 133 दीपस्तंभ, 4,087 झाडे, 114 आधुनिक साइन बोर्ड आणि टेरेस्ड गार्डन्स हे राष्ट्रीय राजधानीत पुनर्विकसित सेंट्रल व्हिस्टाचा भाग असतील. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सेंट्रल व्हिस्टा पादचाऱ्यांना चोवीस तास राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट दरम्यान आणि राजपथच्या बाजूने बागांमध्ये एकूण 915 दीपस्तंभ असतील. तसेच, नवीन संसद भवनात जाण्यासाठी सहा मार्ग असतील. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी एक प्रवेशद्वार असेल. लोकसभेचे सभापती, राज्यसभा अध्यक्ष, खासदारांच्या प्रवेशासाठी एक प्रवेशद्वार आणि दोन सार्वजनिक प्रवेशद्वार असतील. यावर्षी, राजपथवर प्रजासत्ताक दिनाची परेड पाहणाऱ्या लोकांना सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून राजपथचे नवे रूप बघायला मिळणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्यांनी सेंट्रल व्हिस्टा साइटला भेट दिली, त्यांनी सांगितले की रविवारी राजपथवर पूर्ण ड्रेस रिहर्सल परेड होईल. देशाच्या नवीन संसद भवनाच्या उभारणीचा खर्च जवळपास 29% ने वाढून 1,250 कोटी रुपये झाला आहे. यापूर्वी ते 971 कोटी रुपयांना बनवले जाणार होते. अतिरिक्त काम, बांधकाम आराखड्यातील बदल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन हे खर्च वाढण्याचे कारण आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Delhi, Parliament

    पुढील बातम्या