नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेली पहिली विमानवाहू युद्धनौका 'विक्रांत' (Vikrant -IAC) आजपासून समुद्रातील विविध चाचण्यांसाठी (Sea Trials) सज्ज झाली आहे. भारताला 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या INS विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेच्या नावावरूनच भारतीय नौदलाने स्वबळावर बनवलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेला व्ही फाँर व्हीक्ट्रीची सुरवात करणाऱ्या विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचंच नाव पुन्हा एकदा देण्यात आलं आहे.
Indigenous Aircraft Carrier (IAC) विक्रांत विमानवाहू युद्धनौका तिच्या पहिल्या सागरी चाचण्यांसाठी सज्ज झाली असून हा भारतासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक दिवस आहे. आतापर्यंतची सर्वात गुंतागुंतीची आणि सर्वात मोठी युद्धनौका भारतात तयार करण्यात आली आहे.
भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेल्या या विमानवाहू युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाचा आता मोजक्याच बलाढ्य देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. भारतीय नौदलात सध्या INS विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका देशाच्या समुद्र सीमांचं रक्षण करण्यासाठी तैनात आहे. पुढील 3 वर्षात सर्व समुद्रातील विविध चाचण्या पूर्ण करून IAC Vikrant भारतीय नौदालाची सेवा करण्यासाठी सज्ज होईल.
भारतीय नौदलाने स्वबळावर बांधलेली पहिली विमानवाहू युद्धनौका 'विक्रांत' आजपासून समुद्रातील विविध चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे. pic.twitter.com/acc6psStES
— News18Lokmat (@News18lokmat) August 4, 2021
दरम्यान, INS विक्रांत या महाकाय युद्धनौकेत 40 विमानं प्रत्येक वेळी उड्डाण घेण्यासाठी सज्ज राहू शकतात. त्याचबरोबर मीग-29 सारखे 26 आधुनिक विमानं एकाच वेळी या युद्धनौकेवर तैनात केले जाऊ शकतात. तसेच दहा लहान हेलिकॉप्टर देखील याठिकाणी ठेवले जाऊ शकतात. या INS विक्रांतची एकूण लांबी तब्बल 260 मीटर एवढी आहे. सध्या भारताकडे केवळ INS विक्रमादित्य ही एकच विमानवाहक युद्धनौका आहे. ही युद्धनौका काही वर्षांपूर्वी रशियाकडून विकत घेण्यात आली होती. ही युद्धनौका सध्या अरबी समुद्रात कारवार जवळ तैनात करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.