मराठी बातम्या /बातम्या /देश /

दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतो शेतकरी; 26 लाखांचं विजेचं बिल पाहून हादरला

दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतो शेतकरी; 26 लाखांचं विजेचं बिल पाहून हादरला

वारंवार वीज विभागाच्या फेऱ्या मारुनही कोणीही त्याची बाजू ऐकून घेण्यास तयार नव्हते

वारंवार वीज विभागाच्या फेऱ्या मारुनही कोणीही त्याची बाजू ऐकून घेण्यास तयार नव्हते

वारंवार वीज विभागाच्या फेऱ्या मारुनही कोणीही त्याची बाजू ऐकून घेण्यास तयार नव्हते

  • Published by:  Meenal Gangurde

उन्नाव, 9 डिसेंबर : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नावमधील वीज विभागाचं (Electricity bill) मोठं दुर्लक्ष झाल्याची घटना समोर आली आहे. विभागाच्या कारनाम्यांमुळे एका शेतकऱ्याच्या घरात अनागोंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्यक्षात विभागाने शेतकऱ्याच्या घरी 26 लाख रुपयांचं भलंमोठं वीज बिल पाठविले आहे. हा शेतकरी (Farmer) अनेक दिवसांपासून विभागाच्या चकरा मारत आहे, पण त्याचे ऐकण्यास कोणीही तयार नाही. वीज विभागाने यावर सांगितलं की, वीज बिलात गोंधळ झाला असून तातडीने सुधारणा केली जात आहे.

4 डिसेंबर रोजी गंगा घाट पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात राहणारे रामू राठोड यांच्या घरी 26 लाख रुपयांचं विजेचं बिल आलं. एवढं मोठं बिल पाहून भूमिहीन शेतकरी रामू राठोड यांच्या कुटुंबाला धक्का बसला. तेव्हापासून शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. पण कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तरा नाही. रामू राठोड म्हणाले की, त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि पाच मुलींचे लग्न करायचे आहे. मला 26 लाख रुपयांचं बिल कसं आले हे काहीच कळत नाही. अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं तर ते केवळ आश्वासनं देत आहेत, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही.

जेव्हा न्यूज 18 ने वीज विभागाचे अधिकारी उपेंद्र तिवारी यांना विचारलं तर ते म्हणाले की, तुमच्या माध्यमातून ही बाब आमच्या निदर्शनास आली. शेतकऱ्याचे वीज बिल तत्काळ बदलण्यात येईल. ते म्हणाले की तांत्रिक अडथळ्यामुळे त्याला 26 लाख रुपयांचं वीज बिल गेले. कधी कधी मीटर 8 हजार, 80 हजार यूनिटमधून बिल जनरेट केला जातो. यानुसार आणखी वीज बिलांना तत्काळ योग्य करण्यात येईल.

First published:

Tags: State Electricity, Uttar pradesh