शेतात काम करायला मजूर नाहीत; शेतकऱ्याने पाठवलं थेट एअर तिकीट

शेतात काम करायला मजूर नाहीत; शेतकऱ्याने पाठवलं थेट एअर तिकीट

लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने मोठ्या संख्येने मजूर आपल्या गावी गेले होते

  • Share this:

नई दिल्‍ली. लॉकडाउन (Lockdown) लागू झाल्यानंतर दिल्‍ली-एनसीआर (Delhi-NCR) मधून घरी गेलेल्या प्रवासी मजुरांची (Migrant Laborers) आता कमतरता भासू लागली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्यांनी आता शेतात काम करण्यासाठी मजुराना परतण्याचं आवाहन केलं आहे.

प्रवासी मजुरांच्या कमतरतेमुळे दिल्‍ली (Delhi) चा एक शेतकरी पप्‍पन सिंह (Pappan Singh) यांनी मजुरांना बोलावण्यासाठी थेट एअर तिकिटचं पाठवलं आहे. या शेतकऱ्याला आपल्या मशरूमच्या (mushroom) शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज होती. आपली गरज पूर्ण करण्यासाठी पप्‍पन सिंह यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी एअर तिकीट बूक केले आहे. हे प्रवासी मजूर बिहारमधील पाटना एअर पोर्टहून (Patna Airport) लवकरच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टसाठी  (Indira Gandhi International Airport) रवाना होतील.

विशेष म्हणजे पप्पन सिंह दिल्लीतील तिगिपुर गावातील राहणारे आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून मशरुमची शेती करीत आहेत..विशेष म्हणजे त्यांच्या शेतात काम करणारे मजूरदेखील दीड दशकापासून त्यांच्या शेतात काम करतात. मशरुमची शेती करण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा महत्वाचा असतो. त्यांना आपल्या जुन्या मजुरांची गरज होती, हे सर्व मजूर लॉकडाऊनमध्ये बिहार आपल्या गावी निघून गेले होते. पप्‍पन सिंह यांनी या सर्व मजुरांना पहिल्यांदा ट्रेनचं तिकीट बुक करण्याचा विचार केल, मात्र पुढील दीड महिन्यांपर्यंत कोणतीही ट्रेन उपलब्ध नाही, अशावेळी पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी एअर तिकीट बूक केलं आहे.

ही पहिली वेळ नाही की जेव्हा पप्पन सिंहयांनी आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी एअर तिकीट बुक केले आहेत. यापूर्वीही प्रवासी मजुरांसाठी त्यांनी एअर तिकीट बूक केलं आहे. लॉकडाऊनदरम्यान मजुरांना घरी पाठविण्यासाठी त्यांनी 10 जणांना दिल्ली ते पाटनापर्यंतचं एअर तिकीट बूक करुन दिलं होतं.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 9:29 PM IST

ताज्या बातम्या