मराठी बातम्या /बातम्या /देश /प्रेम विवाह केला म्हणून लेकीचा घेतला जीव, हत्या करत मृतदेह 80 किमी दूर नाल्यात फेकला

प्रेम विवाह केला म्हणून लेकीचा घेतला जीव, हत्या करत मृतदेह 80 किमी दूर नाल्यात फेकला

पुन्हा सैराट...शीतलने प्रेमविवाह केला म्हणून कुटुंब नाराज होते. लग्न तोडण्यास ती तयार नसल्याने आई-वडिलांनी तिची गळा घोटून हत्या केली

पुन्हा सैराट...शीतलने प्रेमविवाह केला म्हणून कुटुंब नाराज होते. लग्न तोडण्यास ती तयार नसल्याने आई-वडिलांनी तिची गळा घोटून हत्या केली

पुन्हा सैराट...शीतलने प्रेमविवाह केला म्हणून कुटुंब नाराज होते. लग्न तोडण्यास ती तयार नसल्याने आई-वडिलांनी तिची गळा घोटून हत्या केली

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : राजधानी नवी दिल्लीतील न्यू अशोक नगर येथे एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील 25 वर्षीय तरुणीची गळा घोटून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात कुटुंबातील 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या मृत तरुणीने नाव शीतल चौधरी असं आहे. शुक्रवारी मृत तरुणीचे वडील रवींद्र, आई सुमन, काका संजय, ओम प्रकाश, आतेभाऊ प्रवेश आणि नात्यातील एक जावई अंकित यांना अटक करण्यात आली आहे.

मुलीच्या प्रेमविवाहामुळे कुटुंब होतं नाराज

शीतलचे शेजारी राहणाऱ्या अंकित नावाच्या तरुणासोबत गेल्या तीन वर्षांपासून तिचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्या दोघांनी घरात कोणालाही न सांगताच आर्य समाज मंदिरात ऑक्टोबर 2019 रोजी लग्न केले. लग्नानंतरही मुलीचे कुटुंब तिला लग्न तोडण्यासाठी जबरदस्ती करीत होते. मात्र ती लग्न तोडण्यास तयार नसल्याने त्यांनी तिच्या मृत्यूचा सापळा रचला आणि 30 जानेवारी रोजी तिची हत्या केली. त्यानंतर कुटुंबानी तब्बल 80 किलोमीटर लांब मुलीचा मृतदेह अलीगड येथील नाल्यात टाकला. पतीने शीतल हरविल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ही सर्व बाब उघडकीस आली.

हेही वाचा - धक्कादायक! ‘प्रहार’चे तुषार पुंडकर यांची गोळी झाडून हत्या

तरुणीच्या पतीने तक्रार केली दाखल

या प्रकरणानंतर जेव्हा पती आपल्या पत्नीला फोन करत होता, तेव्हा तिचा फोन बंद येत होता. यानंतर तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. न्यू अशोक नगर ठाण्यात तरुणाने पत्नी हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी याबाबत शीतलच्या कुटुंबाकडे चौकशी केली तेव्हा ते टाळाटाळ करीत होते. ती नातेवाईकांकडे गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र शीतल नातेवाईकांकडेही सापडली नाही. यामुळे पोलिसांना कुटुंबावर संशय आला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड काढले. यामध्ये 30 जानेवारी रोजी कुटुंबातील सदस्यांमध्ये बरीच बातचीत झाल्याचे दिसले होते. यानंतर पोलिसांनी शीतलच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची स्वतंत्र चौकशी केली. शेवटी शीतलच्या कुटुंबीयांनी केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली. शीतलची हत्या केल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा मृतदेह सफेद रंगाच्या वॅगनारच्या मागच्या सीटवर बसवला आणि तेथून तिचा मृतदेह 80 किमी लांब असलेल्या नाल्यात टाकला होता. चौकशीदरम्यान कुटुंबीयांनी हा खुलासा केला.

First published:
top videos

    Tags: Crime, Delhi, Love marriage