जीएसटीमुळे अमृतसरच्या 'लंगर'वरती 10 कोटींचा बोजा !

जीएसटीमुळे अमृतसरच्या 'लंगर'वरती 10 कोटींचा बोजा !

या लंगरमध्ये विकडेजला 50,000 तर विकेन्डसला 1 लाख लोकं जेवतात.

  • Share this:

अमृतसर,08जुलै :1 जुलैपासून देशभर जीएसटी लागू करण्यात आला. या जीएसटीबद्दल काही लोक चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत तर काही वाईट.जीएसटीचा मध्यमवर्गावर काय परिणाम होईल हा प्रश्न पडला असताना लाखो गरीबांना रोज फुकट जेवण देणाऱ्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या लंगरला मात्र याचा चांगलाच फटका बसणार आहे .

सुवर्ण मंदिराचे लंगर आठवड्याचे सातही दिवस चालू असतं. या लंगरमध्ये विकडेजला 50,000 तर विकेन्डसला 1 लाख लोकं जेवतात. हे लंगर दिवसात फक्त दोन तास बंद असतं तर बाकी पूर्ण दिवस अविरत चालू असते. या लंगरमध्ये दिवसाला 7000 किलो गव्हाचं पीठ, 1200 किलो भात, 1300 किलो डाळ, 500 किलो तूप एका दिवसाला लागते. आतापर्यंत या लंगरचा खर्च 75 कोटी इतका होत होता. जीएसटीमुळे तूपावर 12%,साखरीवर 18% आणि डाळीवर 5% कर लागल्यामुळे आता हाच खर्च 85 कोटी रुपये इतका होणार आहे.जगात दिवसाला इतक्या मोठ्या प्रमाणात जेवण बनवणारं आणि देणारं हे एकमेव लंगर आहे.

जीएसटीमुळे फक्त मध्यमवर्गाचाच खिसा रिकामा होणार नाहीय तर गरीबांची, भुकेल्यांची सेवा करणंही आता देशात महाग होईल असं दिसतंय.

First published: July 8, 2017, 9:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading