नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाची 'क्लिन चीट'

नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाची 'क्लिन चीट'

पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं असं आढळून आलं नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 30 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने क्लिन चीट दिली आहे. काँग्रेसने पंतप्रधानान विरुद्ध ही तक्रार दिली होती. आपल्या तक्रारीवर निवडणूक आयोग तातडीने कारवाई करत नाही असा आरोपही काँग्रेसने केला होता. त्यासाठी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धावही घेतली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निकाल दिलाय.

महाराष्ट्रातल्या वर्धा इथं झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्या केरळमधल्या वायनाड येथून निवडणूक लढण्याबाबत टीका केली होती. ज्या ठिकाणी मायनॉरीटीचे लोक मेजॉरीटीमध्ये आहेत अशा ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत अशी टीका पंतप्रधानांनी केली होती. पंतप्रधान धार्मिक आधारावर ध्रुविकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं असं आढळून आलं नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आधी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपाच्या नेत्या मायावती, समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली होती.

राहूल गांधी यांना नोटीस

लोकसभेच्या निवडणुका सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्व सिद्ध करण्याची नोटीस दिल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या पायाखालची वाळू सरकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाची भीती असल्यानेच त्यांनी राहुल गांधी यांना टार्गेट केलं असल्याचा आरोप काँग्रसने केला आहे.

भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वावर काही सवाल केले. त्यानंतर आता गृहमंत्रालयानं राहुल गांधी यांना नोटीस पाठवत तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध करा असं म्हटलं आहे. सोमवारी सुब्रम्हण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल आणि शैक्षणिक पात्रतेबद्दल सवाल केले होते. शिवाय, स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तशी तक्रार देखील सादर केली होती. त्यानंतर गृहमंत्रालयानं राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.

अक्षरमंत्र : 'अक्षरमंत्र'चे सर्व भाग आता एका 'क्लिक'वर

VIDEO अक्षरमंत्र : असं काढा सुंदर अक्षर; रेषांचा सराव असा करा

First published: April 30, 2019, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading