Home /News /national /

भीषण अपघातानंतर ट्रकखाली अडकला ड्रायव्हर; 5 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर असा वाचवला जीव

भीषण अपघातानंतर ट्रकखाली अडकला ड्रायव्हर; 5 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर असा वाचवला जीव

या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात चालक थोडक्यात बचावला

    शंगाबाद, 16 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) होशंगाबाद जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे इंदूर-बैतूर नॅशनल हायवे वर (Indair-Betul National Highway) दिवाळीच्या दिवशी एक भीषण रस्ते अपघात (Road Accident) झाला. लोखंडाच्या प्लेट्सने भरलेल्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो उलटला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालकाव्यतिरिक्त एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे ट्रकचा ड्रायवर (Truck Driver) वाहनाच्या खाली दबला गेला होता. त्याला ट्रकच्या खालून बाहेर काढणं अवघड जात होतं. खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर अनेक तासांनी त्याला बाहेर काढण्यात यश आलं. यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना होशंगाबाद जिल्ह्यातील सिवनी मालवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 108 रुग्णवाहिकेचे इएमटी विद्यासागर पवार यांनी अडकलेल्या अवस्थेतच वाहन चालकाला सलाइन लावली आणि वेदनाशामक इंजेक्शन देऊन उपचार सुरू केला. ट्रकच्या खाली अडकलेले चालक देवप्रताप यांना बाहेर काढण्यासाठी 5 तासांहून अधिक वेळ लागला. यानंतर जखमी चालकाला क्रेन आणि गॅस कटरच्या मदतीने ट्रकचा काही भाग कापून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे चालकाचा जीव वाचला. यावेळी शेजारील गावातील पोलिसही घटनास्थळी पोहोचले. हे ही वाचा-मुलं फटाके फोडत असताना तरुणावर सपासप कोयत्याचे वार, नाशिकमधील हत्येचा LIVE VIDEO यापूर्वी शनिवारी रात्री रतलाममधील नामली पोलीस ठाणे हद्दीत ग्राम बांगरोद आणि धमोत्तरदरम्यान दोन दुचाकीची जोरदार धडक झाल्यामुळे चार तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून दोन तरुण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे सैलाना पोलीस ठाणे हद्दीत दिवेल-खोखरा मार्गावर दुचाकीची धडक झाल्यामुळे सायकल चालविणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाला.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Road accidents

    पुढील बातम्या