प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर, मोदींचेही जिंकले मन

प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर, मोदींचेही जिंकले मन

मध्य प्रदेशाती देवास जिल्ह्यातील आसाराम नामक एक युवक एमबीबीएस झाला असून, तो एका कचऱ्यातून प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा आहे.

  • Share this:

देवास (मध्य प्रदेश), ता. 28 जुलै : मध्य प्रदेशाती देवास जिल्ह्यातील आसाराम नामक एक युवक एमबीबीएस झाला असून, तो एका कचऱ्यातून प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत राहणारे रंजीत चौधरी आणि ममताबाई यांचा तो मुलगा आहे. घरात अठरा विश्र्व दारिद्र असताना देखील परिस्थितीतीवर मात करून आसारामने एमबीबीएस पूर्ण केले. त्याची ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (एम्स) च्या प्रवेश परिक्षेत त्याची निवड झाली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या आकाशवाणीवरील कार्यक्रमाक आसारामचे आसारामचे कौतुक केले आणी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या

देवासपासून ४० कि.मी. वर असलेल्या विजयागंजमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. एका लहानशा झोपडीत वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबातील कर्ता पुरूष रंजीत चौधरी हे प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या वेचून त्या भंगारमध्ये विकणे हे काम करतात. कधीकधी ते शेतकाम देखील करतात. तर आसारामची आई ममताबाई या गृहिणी आहेत. अशा या परिस्थितीत आसारामने मन लाऊन अभ्यास केला आणि पहिल्या झटक्यात एमबीबीएस पूर्ण केले. ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (एम्स) च्या प्रवेश परिक्षेत आसारामची निवड झाली आहे. घरात अठरा विश्र्व दारिद्र असतानासुद्धा आसारामची शकण्याची जिद्द ही देशातील ईतर मुलांना आणि मुलींना प्रेरणादायी असल्याचे सागून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवर पार पडलेल्या त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाक आसारामचे कौतुक केले आणी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या.

VIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमी

राहुल गांधी आणि शिवराज सिंह चौहाण यांनीही दिल्या शुभेच्छा

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात कचऱ्यातून पास्टिक वेचून घर चालवणाऱ्याचा मुलची ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज (एम्स) च्या प्रवेश परिक्षेत निवड झाल्याबद्दल मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण आणि कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्राद्वारे आसारामला शुभेच्छा दिल्या.

आसारामचे वडील म्हणतात, माझ्यासाठी तर हे स्वप्नच..

आसारामचे वडील कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करतात व ते विकून अपले घर चालवतात. आसारामने मिळविलेल्या यशाबद्दल ते म्हणतात की, माझ्यासाठी तर हे सगळं स्वप्नवत आहे. कारण, एवढा विचार मी कधीच केला नव्हता.

हेही वाचा..

पिकनिकला गेलेल्या युवकाचा अतिउत्साह त्याच्याच जीवावर बेतला

VIDEO VIRAL : उत्तरप्रदेशातल्या जेलमध्ये गँगस्टरचं बर्थ डे सेलिब्रेशन !

गणपतीच्या सजावटीत 'इकोफ्रेंडली' साहित्य वापरा - पंतप्रधानांचं मंडळांना आवाहन

First published: July 29, 2018, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading