मिझोराम, 12 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात एकमेकांपासून दुरावा आला असला तरी अशाच परिस्थितीत माणुसकी जपत मिझोराममधील एका आमदाराने आदर्शवत उदाहरण पुढे ठेवलं आहे. मिझोराममधील आमदार ZR Thiamsanga आपल्या चम्पाई या भागात भूकंपानंतरचा दौरा करण्यासाठी गेले होते. तेथे एका गर्भवती महिलेला प्रसूती करण्यासाठी तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती.
यावेळी जिल्हा रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याचे आमदारांना सांगण्यात आले. आमदार स्वत: व्यवसायाने डॉक्टर असून गायनोक्लॉजीचे तज्ज्ञ आहेच. सकाळी आमदारांना याबाबतची माहिती देण्यात आली. महिला अत्यंत छोट्या गावात राहते. प्रसवकळा सुरू झाल्याने तिला त्रास असह्य होत होता. तिच्या प्रकृती नाजूक होत चालली होती. त्यात तिला रक्तस्त्रावही सुरू झाला होता आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण खालावलं होतं, आमदारांना याबाबतची माहिती दिली. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Mizoram legislator ZR Thiamsanga, a doctor by profession, who was visiting the earthquake-hit areas of the remote Champhai dist, performed an emergency caesarean & helped a woman deliver when he was told there was no doctor in the hospital.
अशात जिल्हा रुग्णालयाती डॉक्टर प्रकृती चांगली नसल्याने उपलब्ध नव्हते आणि दुसरं रुग्णालय तेथून 200 किमी लांब होतं. अशावेळी आमदारांनी अजिबात वेळ न दवडता स्वत: महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर मी सकाळी जिल्हा रुग्णालयात पोहोचलो आणि 9.30 वाजता शस्त्रक्रिया केला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून बाळ आणि आईची प्रकृती चांगली आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच या आमदारांनी मदत केली नाही, तर यापूर्वीही डॉक्टरी नंतर राजकीय क्षेत्रात दाखल झालेल्या आमदारांनी एक गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करुन दिली.