असा कॉम्रेड होणे नाही! सोनिया गांधीनंतर कॉंग्रेसमधली चौथी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अहमदभाई पटेल

पटेल यांच्या निधनामुळे पक्षातील असंतुष्ट नेते, राज्यांत वर्चस्व असणारे नेते हे अधिक जोराने आपला आवाज उठवतील आणि काँग्रेस नेतृत्वाला अडचणीत आणतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

पटेल यांच्या निधनामुळे पक्षातील असंतुष्ट नेते, राज्यांत वर्चस्व असणारे नेते हे अधिक जोराने आपला आवाज उठवतील आणि काँग्रेस नेतृत्वाला अडचणीत आणतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

  • Share this:
    रशिद किडवाई असं म्हटलं जातं की निझाम उल मुल्क सम्राट महंमद शाहच्या दरबारातून गेल्यानंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली होती. अहमद पटेल यांचा मृत्यू काँग्रेस पक्षासाठी मोठा हादरा ठरू शकतो. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधीनी प्रयत्न करूनही देशात काँग्रेस पक्ष उभारणीची चिन्ह दिसत नसताना, पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षविरोधी सूर आळवत असताना, काँग्रेसची विभागणी होण्याच्या मार्गावर असताना संपूर्ण पक्षाला एकसंध बांधून ठेवण्याचं काम अहमद पटेल यांनी केले होते, मात्र त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पटेल यांच्या निधनामुळे पक्षातील असंतुष्ट नेते, राज्यांत वर्चस्व असणारे नेते हे अधिक जोराने आपला आवाज उठवतील आणि काँग्रेस नेतृत्वाला अडचणीत आणतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ट्विट करून अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. यात त्यांनी ‘ मी एक अत्यंत विश्वासू सहकारी, जवळचा मित्र गमावला आहे. असा कॉम्रेड होणे नाही.’, असे म्हटले आहे. येणाऱ्या कठीण काळात सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी दोघांनाही अहमद पटेल यांची कमी खूप जाणवेल हे निश्चित. पटेल यांना काँग्रेसमध्ये भाई म्हटलं जायचं सोनियांना गेल्या जवळजवळ दोन दशकांमध्ये ज्या व्यक्तीकडे कधीही हक्काने जाता येईल असं व्यक्तिमत्व म्हणजे पटेल होते. काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पटेल यांचा फोन कॉल गेला म्हणजे पंजाबचे कॅप्टन अमरिंदरसिंग असो, राजस्थानचे अशोक गेहलोत असोत वा पाँडिचेरीचे नारायणसामी यांच्यासाठी ती काँग्रेस हायकमांडची आज्ञाच असायची. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांचे नेते, कॉर्पोरेट वर्ल्ड, मीडिया, धार्मिक नेते किंवा संस्थांचे प्रमुख सर्वांसाठीही पटेल यांचा शब्द हाच काँग्रेसचा शब्द होता. या काळात अनेक तडजोडी कराव्या लागल्या पण बहुतांश वेळा योग्य तोडगा काढून मोठं नुकसान टाळण्याची हातोटी पटेल यांच्याकडे होती. जगण्याच्या प्रत्येक ‘मी आपला ऋणी आहे’ असं पटेलांना म्हणण्याची अनेकांवर वेळ आली आणि त्यांनीही या ऋणाची भरपाई करून घेतली नाही. सोनिया, मनमोहन सिंग यांना समजावलं 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलींवरून तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना कायदेशीररित्या व राजकीदृष्ट्या लक्ष्य करण्याच्या इतर काँग्रेस नेत्यांच्या सल्ल्याला पटेलांनी नेहमीच जोरदार विरोध केला होता. 2004 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि कायद्याचे जाणकार तर मोदींविरुद्ध जोरदार कारवाईची पाठराखण करत असतानाच पटेल यांनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना पटवून दिलं की त्या प्रकरणात पद्धतशीरपणे कायदेशीर कारवाई होणंच योग्य आहे. काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी पटेल यांच्याविरुद्ध आकस मनात धरला पण भरूचमधून निवडून आलेले खासदार पटेल यांचा आत्मविश्वास जबरदस्त होता आणि तो दहा वर्ष यूपीएचं सरकार सुरळीत चालेपर्यंत अबाधित राहिला. भाजप व संघ परिवाराने केला पराभव पटेल यांचं भाजप किंवा संघ परिवाराबद्दल नरमाईचं धोरण होतं अशातली बाब नाही. खरं तर त्यांच्यामुळेच पटेलांना मोठा फटका बसला होता. पटेल यांनी 1977, 1980 आणि 1984 ला भरूचमधून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. गुजरातमध्ये 1989-91 या काळात रामजन्मभूमी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचं काम जोमात होतं. त्यांच्याविरुद्ध धार्मिक आधारावर प्रचार झाल्याने 1989 मध्ये पटेल यांचा भरूच लोकसभा मतदारसंघातच पराभव झाला होता. पटेल बाबू भाई म्हणून जनमानसात लोकप्रिय होते. त्यांचा धर्म लोकांना कळावा म्हणून विश्व हिंदू परिषदेने प्रचाराची पोस्टर, भिंतींवरी पेंटिंग, बॅनर सगळीकडे त्यांचं बाबू भाई नाव बदलून अहमदभाई केलं. पटेल यांचा 18 हजार 909 मतांनी पराभव झाला. पटेल गुजरातमधून निवडून येणारे एकमेव लोकसभा खासदार होते त्यामुळे त्यांनी, हा माझा नाही तर धर्म निरपेक्षतेचा पराभव आहे असं म्हटलं होतं. राज्यसभा आणि काँग्रेस अध्यक्षांशी जवळीक लोकसभेतील पराभवामुळे पटेल खचले नाहीत आणि 1993 मध्ये राज्यसभेचे खासदार झाले. 10 जनपथवर अनेक अडचणींचा सामना करणारे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याशी पटेल यांनी जवळीक निर्माण केली. सोनियांशी संवाद करण्यासाठीचा दुवा म्हणून राव यांनी त्यांचा वापर करून घेतला. सीताराम केसरी काँग्रेस अध्यक्ष असताना त्यांनीही हाच डावपेच वापरला होता. तसं बघायला गेलं तर राजीव गांधीच्या काळात जेव्हा जेव्हा नवा काँग्रेस अध्यक्ष निवडला गेला तेव्हा तेव्हा अहमद पटेलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डिसेंबर 2017 मध्ये राहुल गांधी काँग्रेसचे 87 वे अध्यक्ष झाले त्यावेळी पटेलांच्या समकालीनांनी म्हटलं होतं, ‘ New CP (Congress President) Same AP (Ahmad Patel),’ म्हणजे काँग्रेस अध्यक्ष नवे आहेत पण अहमद पटेल जुनचे आहेत. यूपीएच्या काळातील चौथी सर्वांत शक्तिशाली व्यक्ती संयुक्त पुरोगामी आघाडीच्या 2004 ते 2014 या कार्यकाळात केंद्र सरकारमधील सर्वांत शक्तीशाली चार व्यक्तींमध्ये अहमद पटेल होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्यानंतर चौथी महत्त्वाची व्यक्ती होती अहमद पटेल. राहुल गांधींच्या जवळ राहणारे काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ नेते यांच्यातील दुवा म्हणजे पटेल होते. निवडून आलेले प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पटेल व्यक्तिश: ओळखत नाहीत, असा देशातला एकही जिल्हा नव्हता, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. घरातून देशाचा कारभार काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांप्रमाणे पटेलांनी केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यांनी नवी दिल्लीतील 24 अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयातील खोली व्यापण्याऐवजी 23 मदर तेरेसा मार्गावरील आपल्या सरकारी घरातूनच सगळा कारभार चालवला. त्यांचं हे घर शक्तिकेंद्र मानलं जायचं. तिथं जायला बंदी असायची. या घराला अनेक प्रवेश द्वारं आणि बाहेर जायचे मार्ग आहेत. अनेक खोल्या आणि आसन व्यवस्थाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते खासदारांच्या उमेदवारांच्या याद्या, राज्याच्या पदाधिकाऱ्यांची नावं आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची नावं इथंच ठरत असे. पटेल यांची अपॉइंटमेंट मिळणं सर्वात कठिण काम होतं. अगदी रात्री उशिरा लँडलाइनवरून फोन आला तरच अपॉइंटमेंट मिळायची. काँग्रेसचं तिकिट मिळवण्यासाठी इच्छुक लोक पटेल यांना वेगेवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी शुक्रवारच्या नमाजावेळीही गाठण्याचा प्रयत्न करायचे. हा ससेमिरा टाळण्यासाठी काही काळ पेटलांना दरवेळी वेगळ्या मशिदीत नमाज पढायला जावं लागायचं. देवावर विश्वास असणाऱ्या पटेल यांनी 2011 मध्ये हज यात्रा केली होती. दिवसातून पाच वेळा नमाज पढणं, रमजानचे रोजे आणि दररोज सकाळी कुरण पठण त्यांनी कधीच चुकवलं नाही. 2014मध्ये केला होता निवृत्त होण्याचा विचार पटेल 2014 पासून सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करत होते. पण जेव्हा जेव्हा त्यांनी हा विषय सोनिया गांधींसमोर काढला तेव्हा एक निष्ठावंत म्हणून त्यांना ‘हाय कमांड’चा आदेश पाळायलाच हवा असं कारण पुढे करत सोनिया त्यांना निवृत्त होऊ देत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी मी त्यांना अशी विनंती केली होती की तुम्ही एवढ्या मोठ्या कालखंडाचे साक्षीदार आहात त्यामुळे तुम्ही आत्मचरित्र किंवा आठवणींवर आधारित एक पुस्तक लिहावं ज्याचा संशोधकांना आणि अभ्यासकांना फायदा होईल. राजकारणातील काही गुपितं उघड होतील. पटेल यांनी तत्परतेने हा प्रस्ताव फेटाळला ते म्हणाले, ‘ ही (गुपितं) माझ्यासोबत माझ्या कबरीत जाणार.’
    Published by:Priyanka Gawde
    First published: