निवडणूक प्रचारासाठी योगींच्या सभांना मागणी, अमित शहा पडले मागे!

निवडणूक प्रचारासाठी योगींच्या सभांना मागणी, अमित शहा पडले मागे!

योगी आदित्यनाथ यांनी आत्तापर्यंत त्यांनी 50 पेक्षा जास्त सभा छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये घेतल्या आहेत.

  • Share this:

लखनऊ, 3 डिसेंबर : चार राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांना प्रचंड मागणी आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपचे उमेदवार आपल्या विभागात योगींची सभा ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 50 पेक्षा जास्त सभा छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये घेतल्या आहेत.

कडव्या हिंदुत्वाचा चेहेरा असलेले 46 वर्षांचे योगी आदित्यनाथ आपल्या भडक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी थोडा संयम राखला तरी ते मुस्लिमांबाबत असलेल्या आपल्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखले जातात. आक्रमक शैली आणि भगव्या वस्त्रांमुळे त्यांचं आकर्षण लोकांना आहे. याचा पुरेपूर फायदा भाजप करून घेत आहेत.

योगी यांनी छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त 21 सभा घेतल्या होत्या. तर अमित शहा यांनी 9 आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 सभांना संबोधित केलं. मध्यप्रदेशात शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तिथे योगी यांनी 15 सभा घेतल्या तर अमित शहा यांनी   25 तर पंतप्रधानांनी 10 सभा घेतल्या.

सात तारखेला निवडणूक असलेल्या राजस्थानमध्ये योगी यांनी 17 सभा घेतल्या तर पंतप्रधानांच्या एकून 10 सभा होणार आहेत.  उत्तरप्रदेश भाजपचे प्रवक्ते शलभमणी त्रिपाठी यांनी सांगितलं की योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढत आहे त्यामुळंच त्यांना देशभरातून बोलावलं जातंय.

त्यांनी उत्तरप्रदेशात विकासाचं एक नवं पर्व सुरू केलंय. गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने चार लाख कोटी रूपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तर 60 हजार कोटींचे प्रकल्प प्रत्यक्षात आले आहेत.

First published: December 3, 2018, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading