Home /News /national /

जेलमध्ये असताना केला असा कारनामा की 8 वर्षांनंतर बाहेर येताच मिळाली सरकारी नोकरी

जेलमध्ये असताना केला असा कारनामा की 8 वर्षांनंतर बाहेर येताच मिळाली सरकारी नोकरी

या व्यक्तीचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, यूनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिवर्सल रेकॉर्ड फोर आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

    अहमदाबाद, 9 नोव्हेंबर : सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की तुरुंगात गेल्यानंतर कैदी आयुष्याला कंटाळतो व अधिक हिंस्त्र बनतो. मात्र काही ठिकाणी तुरुंगात (Jail )गेल्यानंतर काही व्यक्ती आपलं भविष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. गुजरातमधील (Gujrat) भावनगरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या भानूभाई पटेल यांनी तुरुंगात राहून 8 वर्षात 31 डिग्री मिळवली. विशेष म्हणजे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांना सरकारी नोकरीची ऑफरही  मिळाली. नोकरी लागल्यानंतरच्या 5 वर्षात त्यांनी 23 डिग्री मिळवल्या होत्या. ज्यानंतर भानूभाई पटेल यांचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, यूनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिवर्सल रेकॉर्ड फोर आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. का झाला होता तुरुंगवास? 59 वर्षाचे भानूभाई पटेल मूळ भावनगरमधील महुवा तालुक्यातील राहणरे आहेत. अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण घेतल्यानंतर 1992 मध्ये मेडिकलची डिग्री घेण्यासाठी अमेरिकेत गेले होते. येथे त्यांचा एक मित्र स्टूडेंट व्हिजावर अमेरिकेत नोकरी करीत आपला पगार भानूभाईच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करीत होता. यामुळे त्यांच्यावर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन अॅक्टअंतर्गत (FERA) कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप लागला.  50 व्या वर्षात त्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली. 10 वर्षे त्यांना अहमदाबादच्या तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. सर्वसाधारणपणे तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भानूभाई पटेल यांना आंबेडकर विद्यापीठात नोकरीची ऑफऱ मिळाली आहे. नोकरीनंतर 5 वर्षांत भानूभाईंनी आणखी 23 डिग्री घेतल्या आहेत. आतापर्यंत त्यांना 54 डिग्री मिळाल्या आहेत. हे ही वाचा-कथित लव्ह-जिहादच्या जाहिरातीनंतर Tanishq पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावरुन टीका तुरुंगाच्या अनुभवावर लिहिलं पुस्तक भानूभाईनी कोरोना महासाथीत लावलेल्या लॉकडाऊनदरम्यान आपल्या जेलमधील अनुभव आणि जागतिक स्तरावरील रेकॉर्डपर्यंतच्या प्रवासावर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषोत तीन पुस्तकं लिहिली आहेत. गुजराती पुस्तकाचे नाव 'जेलना सलिया पाछळ की सिद्धि', इंग्रजीत 'BEHIND BARS AND BEYOND' आहे. भानूभाईंनी 13व्या विधानसभा निवडणुकीत प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काम केलं आहे. जेलमध्ये शिक्षित कैद्यांची संख्या वाढतेय नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) च्या रिपोर्टनुसार गुजरातच्या तुरुंगात अशिक्षितऐवजी शिक्षित कैद्यांची संख्या जास्त आहे. ग्रेज्युएट, इंजीनियर, पोस्ट ग्रेज्युएट झालेले कैदींचा यामध्ये समावेश आहे. गुजरातच्या तुरुंगात 442 ग्रेज्युएट, 150 टेक्निकल डिग्री-डिप्लोमा, 213 पोस्ट ग्रेज्युएट आहेत. सर्वात जास्त आरोपी हत्या आणि अपहरणाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या