बरा झालेल्या रुग्णाला पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण, पुढील काही दिवस धोक्याचे

बरा झालेल्या रुग्णाला पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण, पुढील काही दिवस धोक्याचे

कोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतरही पुढील 30 दिवस हा विषाणू रुग्णाच्या नाकात असतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) औषधे तयार करण्यासाठी तज्ज्ञांकडून बरेच प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

जर रुग्णाला कोरोनाची (Covid - 19) लागण झाली असेल आणि त्यातून तो पूर्ण बरा झाला असं चाचणीतून समोर आलं असलं तरी हा आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. 1 वा 2 रुग्णांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. केके अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. हा रोग बरा झाल्यानंतरही कोरोना व्हायरस 30 दिवस नाकात राहतो.

संबंधित -कोरोनामुळे सोने व्यापाराची चमक गायब, दागिन्यांची मागणी 75 टक्क्यांनी घटली

म्हणून, भारत सरकारने तयार केलेल्या नव्या धोरणानुसार रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याची 2 वेळा चाचणी केली जावी आणि जेव्हा त्या दोन्ही चाचण्या नकारात्मक येतील तेव्हाच तो बरा असल्याचे सांगावे. .

कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतरही 14 दिवस वेगळे ठेवले जाते. आपल्याकडील विविध आजारांद्वारे व्हायरसचा फैलाव होऊ शकतो. हे स्वाइन फ्लू इ. मध्ये दिसून आले आहे. पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. भारताने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बंदी आणली आहे. ज्यांना थेट संसर्ग आहे त्यांनी क्वारंटाइनमध्ये राहत आजार नियंत्रणात येईपर्यंत अधिक काळजी घ्यावी.

संबंधित - राजकीय वर्तुळात कोरोनावरुन फटकेबाजी, इटली कनेक्शनमुळे राहुल गांधी निशाण्यावर

भारतातील हवामान आणि लोकसंख्या हा व्हायरस पसरवण्यास पुरसं आहे. भारतात बहुतेक शहरांमध्ये एक तरी ठिकाण असं असतं, जिथं घरं आणि लोकांमध्ये खूप कमी अंतर असतं. अशावेळी कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका वाढतो.भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांचा आकडा 147 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 42 रुग्ण आहेत. तर देशात तिघांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

First published: March 18, 2020, 4:39 PM IST

ताज्या बातम्या