खुशखबर, 'यामुळे' इंधनाचे दर होतायत कमी

खुशखबर, 'यामुळे' इंधनाचे दर होतायत कमी

आंतरराष्ट्रीय बाजारात बऱ्याच घडामोडी घडतायत. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरही थेट पडतो.

  • Share this:

मुंबई, 03 जून : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात. गेल्या सहा महिन्यात त्या कमी होतायत. मेमध्ये त्या 10 टक्क्यांहून घसरल्यात. गेल्या 7 वर्षातल्या या सर्वात कमी किमती आहेत. नोव्हेंबर 2018नंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू आहेच.

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम भारतावर होणारच. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होणार. भारत 84 टक्के तेल आयात करतं. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण भारताला फायदेशीरच पडणार. 25 एप्रिलला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 75.60 डाॅलर्स प्रति बॅरल झाली होती. ती सर्वात जास्त होती.

पतधोरणाच्या आशेनं बाजार वधारला, 'या' शेअर्समध्ये विक्रमी तेजी

'या' कारणामुळे भारतातल्या अनेक नोकऱ्यांवर टांगती तलवार

या घसरणीचं कारण

सध्या अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वाॅर सगळ्यांनाच माहीत आहे. पण फक्त त्यामुळे या किमती कमी झालेल्या नाहीत. चीननंतर अमेरिकेनं मेक्सिकोवर आयात शुल्क लावायचं ठरवलं आहे. त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर होतोय. शिवाय अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठल्याही अटीशिवाय इराण सरकारसोबत न्यूक्लियर प्रोग्रॅमबद्दल बोलायची तयारी दर्शवलीय. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात.यामुळे आॅइल आणि गॅस शेअर्समध्ये तेजी आली. IOC आणि BPCL यांनी नवा विक्रम केला.

मोदी सरकार देतेय वर्षाला 10 लाख रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' व्यवसाय

पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संस्थेच्या 14 सभासदांची मीटिंग 25 आणि 26 जून रोजी व्हिएन्ना इथे होणार आहे. या घसरलेल्या किमती वाढवण्याबद्दल या मीटिंगमध्ये चर्चा होईल.

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं आपल्याला फायदा होतोच आहे. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल,डिझेलचे भाव कमी झालेत. मुंबईत पेट्रोल 18 पैशांनी कमी झालंय.


VIDEO : गुजरातमध्ये दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, दारू विकण्यास केला होता विरोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या