• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ...अन् वासरासह गाय केली न्यायालयात हजर

...अन् वासरासह गाय केली न्यायालयात हजर

न्यायाधीशांनी केसची सुनावणी करण्यासाठी गाय आणि वासरू न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला.

 • Share this:
  जोधपूर, 13 एप्रिल : न्यायलयात कधी कधी अशा काही गोष्टीवर निवाडा करावा लागतो की न्यायाधीशही चक्रावून जातात. राजस्थानमधूल जोधपूर येथे एका न्यायालयात दोन व्यक्तींमध्ये गाय आणि त्याच्या वासरावरून वाद सुरू होता. गाईसह वासरावर कोणाचा हक्क यासाठी गाय आणि वासराला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी न्यायालयाच्या बाहेर उभा असलेल्या गाईजवळ दोन्ही दावेदारांना उभा करून त्यांचे निरिक्षण केले. यात गाई कोणाला प्रतिसाद देते याची पाहणी केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे. या वादाची सुरुवात ऑगस्ट 2018 मध्ये झाली होती. मंदोर पोलिस स्टेशनमध्ये याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिस कॉन्स्टेबल ओम प्रकाश आणि शिक्षक श्याम सिंह या दोघांनी गाई आपली असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना यश आले नाही त्यानंतर गाईला गोशाळेत सोडण्यात आले. तेव्हा तिला चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. गाईच्या मालकी हक्काबाबतचे प्रकरण न्यायालयात पोहचले. या ठिकाणी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटनी गाईला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. त्यांनीही प्रकरण आपआपसांत मिटवावे यासाठी प्रयत्न केला. मात्र, श्याम सिंह यांनी गाय आपलीच असून ती कोणालाही देणार नाही असे सांगितले. VIDEO: उदयनराजेंच्या डायलॉगबाजीवर आदित्य ठाकरे म्हणाले...
  First published: