न्यायालयाने तबलिगी जमातच्या 28 सदस्यांची सुटका करण्याचे दिले आदेश

न्यायालयाने तबलिगी जमातच्या 28 सदस्यांची सुटका करण्याचे दिले आदेश

तबलिगी जमातच्या या सदस्यांवर कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होता

  • Share this:

ठाणे, 26 ऑगस्ट : ठाण्यातील (मॅजिस्ट्रेट) न्यायालयाने विविध प्रकरणात 21 परदेशी नागरिकांसह तबलिगी जमात (Tabligi Jamaat) च्या 28 सदस्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या लोकांविरोधात मार्चमध्ये दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर गुन्हा दाखल केला होता.

परदेशी नागरिकांवर व्हिजा नियमांचं उल्लंघनासोबत कोरोना व्हायरसच्या कहरानंतर जारी केलेल्या दिशा-निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद पीठाने दिल्लीच्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रात येणाऱ्या 29 परदेशी नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. न्यायाधीश आर.एच.झा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत सांगितले की तबलिगी जमातच्या 28 सदस्यांना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांपासून मुक्त होण्याचा हक्क आहे. यावर बचाव पक्षाचे वकील इस्माइल शेख यांनी सांगितले की आरोपींमध्ये 13 बांग्लादेशी, 8 मलेशियाई, 4 भारतीय आणि मुंब्रा येथील परदेशी नागरिकांच्या वास्तव्याच्या दरम्यान त्यांना मदत करण्याऱ्यांमध्ये चार जणांचा समावेश आहे.

हे वाचा-लस दिल्यानंतरही पुन्हा होऊ शकतो कोरोना? 'त्या' 2 रुग्णांनी वाढवली चिंता

सांगितले जात आहे की या महिन्याच्या 22 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाने तबलिगी जमाच्या 29 परदेशी सदस्यांना दिलासा देत त्यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे. या 29 परदेशी लोकांवर भारतीय दंड संहिताअंतर्गत विविध कलमांअंतर्गत एफआयआर दाखल केली होती. या एफआयआरमध्ये त्यांच्यावर पर्यटनाच्या व्हिसाचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. हे सर्वजण दिल्लीतील निजामुद्दीनच्या तबलिगी जमाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि या आरोपाखाली त्यांच्याविरोधात  एफआयआर दाखल करण्यात आली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: August 26, 2020, 10:26 PM IST

ताज्या बातम्या