Home /News /national /

रक्ताने माखलेल्या 5 महिन्यांच्या भ्रूणाला हातात घेऊन रडत होतं दाम्पत्य, मात्र कोणीच मदतीसाठी आलं नाही

रक्ताने माखलेल्या 5 महिन्यांच्या भ्रूणाला हातात घेऊन रडत होतं दाम्पत्य, मात्र कोणीच मदतीसाठी आलं नाही

लॉकडाऊनमध्ये अनेकांना अत्यंत वाईट अनुभव आले आहेत. त्यांच्या आयुष्यातील हे घाव कधीही न भरणारे आहेत

    नवी दिल्ली, 22 मे : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले आहेत. अनेक ठिकाणी तर नागरिकांना अत्यंत वाईट अनुभव आला आहे. अशावेळी लोकांना माणुसकी, कर्तव्य, दया या शब्दांचा विसर पडला की काय असे वाटायला लागते. लॉकडाऊन डायरीजमध्ये यंदाचा प्रसंग मथुरा जिल्ह्यातील वृंदावनचा आहे. ज्यामध्ये एका पित्याने आपल्यासोबत घडलेला त्रासदायक अनुभव News18 हिंदीसोबत शेअर केला. 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला रक्तस्त्राव झाला होता सुरू माझी पत्नी पाच महिन्यांची गर्भवती होती. जानेवारी महिन्यापासून तिच्यावर वृंदावन रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुळे काही दिवसांसाठी सील झालेले रुग्णालय 13 मे रोजी पुन्हा उघडण्यात आलं. त्यानंतर आपल्या पत्नीला घेऊन तो रुग्णालयात दाखल झाला. कारण तिचे अल्ट्रासाऊंड झाले नव्हते. शिवाय कमरेत कळा सुरू होत्या. 13 मे रोजी डॉक्टरांनी माझ्या पत्नीला लांबूनच पाहिले आणि सांगितले 14 मे ला अल्ट्रासाऊंड होईल. शिवाय कळांसाठी गॅसचं औषध दिलं. त्यानंतर आम्ही घरी निघून गेलो. मात्र पत्नीच्या कमरेचं दुखणं काही कमी होत नव्हतं. दुसऱ्या दिवशीही तिचं अल्टासाऊंड करण्यात आलं नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा घरी गेलो. मात्र घरी गेल्यावर पत्नीला त्रास सुरू झाला. तिला रक्तस्त्रावही होऊ लागला,. मी पुन्हा पत्नीला घेऊन रुग्णालयात गेलो. मात्र ड़ॉक्टर निघून गेले होते. आणि नर्सने डॉक्टरांशी फोनवर बोलण्यास सांगितले. माझ्या पत्नीला कळा सुरू होत्या. त्यात रक्तस्त्रावही सुरू होता. मी पत्नीला खुर्चीवर बसण्यास सांगितले. रक्त खुर्चीवर खाली वाहत होतं. मी नर्सला आवाज देत होतो...पण माझं कोणी ऐकल नाही. त्यानंतर पत्नीला वॉश रुममध्ये घेऊन जाण्यात आलं. तिथे माझी पत्नी कळा देत होती. तेथेच पाच महिन्याचं भ्रूण प्रसूत झाला. माझी पत्नी त्या 5 महिन्याचं भृण मांडीवर घेऊन रडत होती..मदत मागत होती..त्यानंतर मी रुग्णालयात गोंधळ घातला. आणि त्यानंतर नर्सने पत्नीच्या हातातून पाच महिन्यांच भृण घेऊन ट्रे मध्ये ठेवलं आणि पत्नीवर उपचार करण्यासाठी तयार झाले. त्यानंतरही विविध कारणांनी रुग्णालय प्रशासनाने त्रास दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या