Home /News /national /

देशातील तरुणवर्ग बॉलिवूडमधील कोडी सोडवण्यात व्यस्त; अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष - चेतन भगत

देशातील तरुणवर्ग बॉलिवूडमधील कोडी सोडवण्यात व्यस्त; अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष - चेतन भगत

लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे...

    मुंबई, 14 सप्टेंबर : लॉकडाऊनमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. परिणामी जीडीपीमध्ये मोठी घट झाली आहे. देशात सध्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान झालं आहे. असे असताना देशातील तरुणवर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांनी सातत्याने देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात मोठा फटका सहन करावा लागण्याची शक्यता लेखक व स्तंभलेखक चेतन भगत यांनी केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे भाष्य केलं आहे. “देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत  आहेत. लोकांना अर्थव्यवस्थेची काळजी नाही, हे सरकारला माहिती असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील संकटं दूर करण्यासाठी ते वेळ खर्च करीत नाहीत. जर लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नाही, त्यांनी याबाबत मागणीच केली नाही तर राजकारणी लोक तरी याची काळजी का करतील?” असा सवाल भगत यांनी केला आहे. लॉकडाऊनमध्ये देशातील अनेकांचा रोजगार गेला..तर अद्यापही अनेकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. देशातील सध्याच्या ठप्प झालेल्या रोजगाराच्या स्थितीवर चेतन भगत म्हणाले, “पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एकतर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल? याचा विचार करण्यात त्यांचा वेळ जाईल.” हे ही वाचा-भारताचा GDP 11.5 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता, Moody's ने देखील व्यक्त केली चिंता चेतन भगत यांनी आपल्या एका लेखात देशातील आर्थिक संकटाबाबत वक्तव्य केलं होतं. जर वेळीत यावर तोडगा काढण्यात आला नाही कर परिस्थिती अधिक भीषण होईल आणि सर्वसामान्य भारतीय आणखी गरीब होतील. त्यांनी यावेळी तरुणांना चांगला सल्लाही दिला आहे. तरुणांनी आता मोबाइल फोनकडे पाहाणं थांबवायला हवं आणि अर्थव्यवस्थेबाबत बोलायला हवं, असेही ते म्हणाले. चेतन भगत पुढे म्हणाले की, सध्याच्या क्षणाला भारतीय तरुण त्यांच्या अवतीभवती काय घडतंय याकडे दुर्लक्ष करीत आहेत.”
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या