घाबरताय का, यांच्याकडे बघा! देशातील सर्वात वयोवृद्धाने 45 दिवसांच्या लढाईनंतर कोरोनाला हरवलं

घाबरताय का, यांच्याकडे बघा! देशातील सर्वात वयोवृद्धाने 45 दिवसांच्या लढाईनंतर कोरोनाला हरवलं

त्यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्यांची प्रकृती खूप नाजूक होती. मात्र केवळ या गोष्टींमुळे ते कोरोनातून बाहेर येऊ शकले

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जून : देशातील कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, चांगली गोष्ट म्हणजे यातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. देशात संक्रमितांमध्ये जास्तीत जास्त रुग्ण 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील आहेत. बहुतेक मृत्यू  50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील आहेत. असे असले तरी सकारात्मक विचार व जिद्दीमुळे बरेच वयस्कर रुग्ण ज्यांचे वय 80 पेक्षा जास्त आहे, तेदेखील कोरोनातून बरे होत आहेत.

अलीकडेच दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल झालेल्या 100 वर्षांच्या मोहम्मद शरीफ यांनी कोरोनाचा पराभव केला आहे. शरीफ यांना 5 जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे. देशात कोरोना साथीच्या आजाराने बरे झालेल्या वृद्ध रूग्णांपैकी शरीफ सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत.

वयोवृद्धाने कोरोनाला हरवलं

वृद्ध व्यक्तीचा मुलगा अलिमुद्दीन याने न्यूज 18 हिंदीशी बोलताना सांगितले की, “कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी धैर्य आणि सकारात्मक विचार आवश्यक आहे. माझे वडील हे याचा पुरावा आहेत. माझे वडील मोहम्मद शरीफ यांना सुमारे 45 दिवस दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात राहिल्यानंतर 5 जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर वडिलांना सुरुवातीच्या दिवसांत बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले होते.

लाल बहादूर शास्त्री रुग्णालय आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयाने माझ्या वडिलांना दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आम्ही त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीच्या काळात, रुग्णालय प्रशासनाने माझ्या वडिलांना मला भेटू दिले नाही. परंतु नंतर मी सोशल डिस्टन्सिंगचं अनुसरण करून माझ्या वडिलांना भेटायला सुरुवात केली. अलीकडे कोरोना तपासणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला.

त्यांच्या धैर्याला सलाम

यमुनेच्या पलीकडे राहणारे मो. शरीफ आता पूर्णपणे बरे झाले आहेत. शरीफ आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आराम करत आहेत. 45 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा त्यांची प्रकृती खूपच वाईट होती. त्यांना श्वास घेण्यास अडचण जाणवत होती. त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची टीम सतत वृद्धांवर नजर ठेवत होती. एलएनजेपीमध्ये उपचारादरम्यान पाईप्सच्या माध्यमातून त्यांना द्रव पदार्थ दिले जात होते. काही दिवसांच्या क्वारंटाईननंतर ते घराबाहेर जाऊ शकतील.

हे वाचा-'मदत हवीये..' दिल्लीतली परिस्थिती दाखवणारा VIDEO राहुल गांधीनी केला शेअर

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 9, 2020, 6:52 PM IST

ताज्या बातम्या