Home /News /national /

देश पुन्हा हादरला; अल्पवयीन मुलीचं डोकं चिरडून हत्या; बलात्कारानंतर दुष्कर्म केल्याचा संशय

देश पुन्हा हादरला; अल्पवयीन मुलीचं डोकं चिरडून हत्या; बलात्कारानंतर दुष्कर्म केल्याचा संशय

पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातून स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे

    भदोही, 1 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) गेल्या अनेक दिवसांत महिलांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. हाथरस प्रकरणानंतर (Hathras Case) बलरामपुर, आजमगढ़ आणि बुलंदशहरमधील घटना समोर आल्या आहेत. आता भदोही (Bhadohi) मध्ये एका 14 वर्षीय मुलीची अत्यंत क्रुरपणे हत्या (Brutal Murder) करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी तिचं डोकं चिरडून तिची हत्या केली. रक्ताळलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह शेतात सापडला. या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांनी बलात्कारानंतर तिची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर पोलिसांकडून बलात्कारासह अन्य मुद्द्यांवरुन तपास करीत आहे. शौचालयासाठी गेली होती.. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांसह क्राइम ब्रांच व फॉरेन्सिक एक्सपर्ट या प्रकरणाचा तपास करीत आहे. 14 वर्षीय मुलगी आज दुपारी शौचालयासाठी घराबाहेर पडली होती. काही वेळानंतर शेतात तिचा मृतदेह सापडला. रक्ताच्या थारोळ्यातला तिचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनाही धक्काच बसला. ज्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे हाथरस प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाले होते. हे ही वाचा-50 लाख देतो मुख्यमंत्री योगी खूर्ची सोडणार का? पीडितेच्या काकाचा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी तेथील काही जणांकडून अडविण्यात आले व उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरत आहे. आज हाथरस येथे 144 कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याने तेथे कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली होती. देशभरातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rape, Uttar pradesh

    पुढील बातम्या