Home /News /national /

अशा पोहोचल्या संसदेत खासदार नवनीत राणा...

अशा पोहोचल्या संसदेत खासदार नवनीत राणा...

केरळमधील 3 रुग्णांनंतर आता नवी दिल्ली, तेलंगणा आणि जयपूरमध्ये कोरोना व्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण आहे

    नवी दिल्ली, 4 मार्च :  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आज संसदेत मास्क घालून आलेल्या दिसल्या. जगभरात पसरणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या देशात केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रातही नाशिकमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा आज संसदेत मास्क घालून आल्या होत्या. कोरोनापासून स्वत:ला वाचविण्यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे. असा संदेश राजकीय नेत्यांकडून दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी यंदा होळी मिलन समारंभात सहभागी होणार नसल्याचं ट्विट केलं आहे. कोरोना'चा धोका वाढला ! केरळमधील 3 रुग्णांनंतर आता नवी दिल्ली, तेलंगणा आणि जयपूरमध्ये कोरोना व्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण आहे. राजस्थानच्या जयपूरमधील पर्यटकाला कोरोना व्हायरस (Coronavirus) असल्याचं स्पष्ट झालं आहे. या रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यामुळे भारतात कोरोना व्हायरसचे एकूण 6 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी केरळमधील पहिले 3 रुग्ण बरे झालेत तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आणखी 6 जणांना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. केंद्र सरकारकडून हेल्पलाईन नंबर आणि नवीन प्रवास नियमावली कोरोना व्हासबाबत माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या 91-11-23978046 क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही मदत मागू शकता, तुमच्या प्रश्नांचं निरसन करू शकता. नाहीतर ncov2019@gmail.com या ई-मेल आयडीवरही तुम्ही मेसेज करू शकता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, Parliament

    पुढील बातम्या