नवी दिल्ली 24 जानेवारी : निर्भया प्रकरणातल्या सर्व दोषींची फाशीची शिक्षा आता अटळ आहे. ही शिक्षा लांबणीवर टाकण्यासाठी आत्तापर्यंत या आरोपींनी अनेक याचिका आणि अर्ज केले होते. आता शिक्षेची अंमलबजावणी काही दिवसांवर येवून ठेपली असताना 3 आरोपींनी पुन्हा एकदा दिल्लीतल्या पातियाळा कोर्टात याचिका दाखल केलीय. आरोपींचे वकील एपी सिंह यांनी तिहार जेल प्रशासनावर आरोपींना आवश्यक ती सर्व कागदपत्र दिली नाहीत असा आरोप केलाय. आपल्याला आरोपींना भेटूही दिलं जात नाही असा आरोपही सिंह यांनी केलाय. या प्रकरणातले आरोपी पवन, अक्षय आणि विनय यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आलीय.
दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी काल गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील गुन्हेगार मुकेश कुमार यांचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर अखेर आता दोषींना फाशी देण्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 1 फेब्रुवारीला निर्भयाच्या 4 आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. या प्रकरणात सर्व आरोपींची दया याचिका फेटाळल्यानंतर अखेर सत्र न्यायालयाने दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता नराधमांना फाशी देण्यात येणार आहे.
'फोन टॅपिंग' वादावर फडणवीसांनी सरकारला दिलं 'हे' आव्हान
आता आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House court) नवीन तारीख जाहीर केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार हे अरोरा खटल्यातील दोषी मुकेश कुमार सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करीत होते.
आणि फाशीची तारीख 22 जानेवारीपासून पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करीत होते. यापूर्वी, तिहार जेल अधिकाऱ्यांनी निर्भया प्रकरणातील चार दोषींवर फाशीची शिक्षा परत देण्याची मागणी दिल्ली कोर्टाकडे केली होती.
दोषींना कोणते पर्याय शिल्लक आहेत
मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडून फेटाळल्यानंतर त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. अक्षय आणि पवन या दोन दोषींना अजूनही क्यूरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. अक्षय, पवन आणि विनयकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा घटनात्मक पर्याय आहे.