एका बकरीचा मृत्यू; कंपनीला कोट्यवधी रुपयांचा चुना, सरकारचेही लाखांचे नुकसान!

एका बकरीचा मृत्यू; कंपनीला कोट्यवधी रुपयांचा चुना, सरकारचेही लाखांचे नुकसान!

काही हजार रुपयांच्या बकरीसाठी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या नुकसानीची बातमी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • Share this:

भुवनेश्वर, 02 ऑक्टोबर: एका बकरीच्या मृत्यूमुळे किती नुकसान होईल असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर यांचे उत्तर साधारण काही हजार असेच मिळेल. पण अशा हा लाख, दोन लाखाच्या बकरीमुळे एखाद्या कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असे जर कोणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या घटनेत विश्वास न बसणारी आणखी एक गोष्ट म्हणजे बकरीच्या मृत्यूमुळे केवळ खासगी कंपनी नव्हे तर सरकारचे देखील काही लाख रुपयांचे नुकसान झाले. जाणून घ्या नेमक झालं तरी काय...

ओडिशा (Odisha)ची राजधानी भुवनेश्वर येथे मंगळवारी एका रस्ते अपघातात बकरीचा मृत्यू झाला. महानदी कोलफीर्ल्ड्स लिमिटेड (mahanadi coalfields limited) कंपनीच्या गाडीच्या धडकेत बकरीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. त्यानंतर कंपनीचे काम बंद पाडले. सकाळी 11 वाजता कंपनीमधील काम बंद पडले आणि दुपारी एक पर्यंत काम बंदच होते. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दुपारी अडीच नंतर कंपनीचे काम पुन्हा सुरु झाले. पण या दोन तासात कंपनीचे तब्बल 2.68 कोटी रुपयांचे नुकसान झाले. इतक नव्हे तर यात सरकारचे देखील 46 लाख रुपये बुडाले. ही घटना चटिया हर्टिंग्स या गावाजवळ झाली.

एका बकरीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी इतक मोठे आंदोलन उभे केले की त्यामुळे काही तासातच कोट्यवधी रुपयांचा चुना लागला. महानदी कोलफीर्ल्ड्स लिमिटेडची गाडी रस्त्यावरून जात असताना बकरी अचानक त्याच्या समोर आली आणि तेथेच तिचा मृत्यू झाला. बकरीच्या मृत्यूसाठी गावकऱ्यांनी प्रथम 60 हजार रुपयांची मागणी केली. 60 हजार रुपयावरून सुरु झालेले हे आंदोलन कंपनीला काही कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारे ठरले.

काही हजार रुपयांच्या बकरीसाठी झालेल्या या कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या नुकसानीची बातमी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: odisha
First Published: Oct 2, 2019 10:21 AM IST

ताज्या बातम्या