मराठी बातम्या /बातम्या /देश /मोठी बातमी! अनलॉक 5 मध्ये चित्रपटगृह होणार खुली; केंद्राने जारी केले गाईडलाईन्स

मोठी बातमी! अनलॉक 5 मध्ये चित्रपटगृह होणार खुली; केंद्राने जारी केले गाईडलाईन्स

माहिती व प्रसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी News18 ला सांगितले की अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू होण्याचा प्रस्ताव आहे. याला गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे. मंत्रालयाने या पूर्वीच चित्रपट गृहांच्या मालकांशी 25 टक्के क्षमतेसह सुरू करण्याबाबत चर्चा केली आहे.

माहिती व प्रसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी News18 ला सांगितले की अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू होण्याचा प्रस्ताव आहे. याला गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे. मंत्रालयाने या पूर्वीच चित्रपट गृहांच्या मालकांशी 25 टक्के क्षमतेसह सुरू करण्याबाबत चर्चा केली आहे.

केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry) अनलॉक 5 (Unlock 5) चे गाईडलाईन्स (Unlock 5.0 Guidelines) जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अनलॉक-5 मध्ये चित्रपटगृह 50 टक्के क्षमतांनी सुरू करता येणार आहे. या टप्प्यात नवरात्र, दुर्गा पूजा, दसरा यांसारखे सण येणार आहेत. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर लोकांना सणांचा आनंदही घेता यावा याची काळजी घेतली गेली आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 5 मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार 5 ऑक्टोबर पासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी 50 टक्के क्षमतांची अट असणार आहे.

अनलॉक 4 (Unlock 4 Guideliens) मध्ये केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यासाठी अंशत: परवानगी दिली आहे. 21 सप्टेंबरपासून देशभरात अंशिक स्वरुपात शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्यापही अनेक राज्यांमध्ये शाळा बंदच आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यासाठी केंद्राच्या परवानगी प्रतीक्षा आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने 15 ऑक्टोबरपर्यंत शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. भारतात एका दिवसात 80472 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर बुधवारी देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 62 लाखांहून अधिक झाली आहे. तर संसर्गापासून बरे झालेल्यांची संख्या 51,87,825  इतकी झाली आहे.

हे ही वाचा-Good News! कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालणार बायोसेन्सर; नवं संशोधन

थोडक्यात-

-कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात यावा

-कंटेन्मेंट झोनबाहेरील व्यवस्था परिस्थिती पाहता सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी.

-50 टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी

-15 ऑक्टोबरनंतर शाळा व महाविद्यालयं सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करू शकतात

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, Coronavirus symptoms