Home /News /national /

दलित समुदायाचे केस कापण्यासाठी 'या' राज्यात सुरू करणार सरकारी सलून, मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

दलित समुदायाचे केस कापण्यासाठी 'या' राज्यात सुरू करणार सरकारी सलून, मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

आजही अनेक राज्यात जातीय भेदभाव केला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत

    कर्नाटक (Karnataka), 20 नोव्हेंबर : सध्या आपण जातीय भेदभावाच्या चौकटी तोडून बाहेर आलो आहोत. मात्र अनेक राज्यांमध्ये आजही जातीवरुन भेदभाव केला जातो..अनेकदा सामाजिक बहिष्कारही टाकला जातो. कर्नाटकमध्ये (Karnatak) दलितांचे (Dalit) केस कापले म्हणून एका न्हाव्याच्या कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आल्याच्या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यामुळे जातीय भेदभाव दूर करण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्नाटकमध्ये सरकारी सलून (Government Salon) सुरू करण्याची शिफारस केली आहे. विविध ग्रामीण भागात सलूनमध्ये जातीय भेदभावाच्या घटना समोर येत आहेत. ज्यामुळे न्हावी दलितांचे केस कापणे आणि शेव्हिंग करण्यास नकार देतात. या जातीय भेदभाव दूर करण्यासाठी समाज कल्याण विभागाने सरकारी सलूनची दुकानं शिफारस केली आहे. केरळमध्ये दलितांना सर्वसाधारण सलूनचा वापर करू दिले जात नसल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यानंतर राज्य सरकारने गावात सरकारी सलून सुरू करण्यासाठी पाऊल उचललं आहे. हे ही वाचा-काश्मिरी IAS तरुणासोबत लग्नामुळे चर्चेत असलेल्या टॉपर टीना डाबीचा घटस्फोटासाठी अ मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावात देण्यात आलं आहे की, अनेक गावांमध्ये न्हावी दलितांचे केस कापणे वा दाढी करत नाही. जातीय भेदभावामुळे त्यांना या सेवेपासून वंचित ठेवलं जातं. अनेकदा दलितांचे केस कापणाऱ्या न्हाव्यावर सामाजिक बहिष्कार घातला जातो. यासाठी सर्व ग्राम पंचायतींच्या सीमांजवळ सरकारी सलूनची दुकाने सुरू करणे गरजेचं आहे. समाज कल्याण विभाग यासाठी आवश्यक निधी मंजुर करणार असल्याचे सांगितलं जात आहे. हा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली एससी-एसटी अत्याचार अधिनियमावर (SC/ST Atrocities Act) समीक्षा बैठकीदरम्यान दिलेल्या एजेंड्याचा एक भाग होता. दरम्यान कर्नाटकातील (karnatak) म्हैसूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका न्हावीवर गावकऱ्यांनी 50000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे त्याने अनुसूचित जाती-जमाती (ST-SC) समुदायाच्या लोकांचे केस कापले म्हणून त्याला हा दंड ठोठावण्यात आला. ही घटना नानजनगुगु भागातील हल्लारे गावातील आहे. व्यवसायाने न्हावी असलेले मल्लिकार्जुन शेट्टी यांनी सांगितले की, त्यांच्यावर 50000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय स्थानिकांनी त्याच्या कुटुंबाचा सामाजिक बहिष्कार केला आहे. दंडामुळे कुटुंब त्रस्त मल्लिकार्जुन यांनी सांगितलं की, यापूर्वीदेखील अनेकवेळा त्यांच्यावर इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी दोन वेळा शेट्टी यांनी दंड भरला आहे. त्यांनी सांगितलं की, गावातील चन्ना नाइक आणि दुसरे लोक त्याला त्रास देत आहे. त्याने एससी आणि एसटी समुदायातील लोकांचे केस कापले आणि दाढी केली त्यामुळे त्याला धमकीही दिली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Karnataka

    पुढील बातम्या