S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'CBI चे दोन ज्येष्ठ अधिकारी मांजरी सारखे भांडत असताना केंद्र गंमत बघणार का?'

जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जातेय असं लक्षात आलं तेव्हा सर्व गोष्टी लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली.

Updated On: Dec 5, 2018 07:28 PM IST

'CBI चे दोन ज्येष्ठ अधिकारी मांजरी सारखे भांडत असताना केंद्र  गंमत बघणार का?'

नवी दिल्ली, 5, डिसेंबर : सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचं केंद्र सरकारनं बुधवारी सुप्रीम कोर्टात जोरदार समर्थन केलं. अलोक वर्मा आणि क्रमांक दोन चे अधिकारी राकेश अस्थाना मांजरी सारखे कडाकडा भांडतात. त्यामुळं सीबीआयच्या प्रतिमेला धक्का बसतो. अशा वेळी केंद्र सरकार गंमत बघू शकत नाही असा युक्तिवाद अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात केला.


अलोक वर्मा यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं, त्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने वेणुगोपाल यांनी हा युक्तिवाद केला. हे प्रकरण सुरू असताना केंद्रानं खूपच धीरानं हे प्रकरण हाताळलं. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जातेय असं लक्षात आलं तेव्हा सर्व गोष्टी लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली असं वेणुगोपाल म्हणाले.तर वर्मा यांचे वकिल फली एस नरिमन यांनी युक्तिवाद करताना केंद्रावर चुकीची कारवाई केल्याचा ठपका ठेवला. सीबीआय प्रमुखाच्या नियुक्तीसठी जर विशेष पद्धत असेल तर त्यांना पदावरून दूर करतानाही तशीच पद्धत वापरली पहिजे मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून वर्मा यांना हटविण्यात आलं.


अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पोलीस स्टेशन गाठलं होतं. त्यामुळं तातडीने मध्यरात्री करावाई करत केंद्रानं वर्मांना सक्तिच्या रजेवर पाठवलं होतं. या कारवाईमुळं देशभर खळबळ उडाली होती. आत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून कोर्टाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं लागलं आहे.


 


 


 

VIDEO : 'बायको परतली नाही, तर उडी टाकेन', असं म्हणत 'तो' चक्क टॉवरव चढून बसला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 07:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close