मुलींच्या लग्नाचे वय वाढणार? मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

मुलींच्या लग्नाचे वय वाढणार? मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

सध्या मुलींच्या विवाहासाठी किमान वय 18 वर्षे आणि मुलांसाठी 21 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जून : मुलींच्या आई बनणे आणि त्यांच्या लग्नासंबंधित मोदी सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जया जेटली यांच्या नेतृत्वात सरकारनं एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. टास्कफोर्सचे मुख्य कार्य स्त्रिया आणि त्यांच्या मुलाचे आरोग्याचा अङ्यास करून मातृत्व आणि विवाहचे योग्य वय याचा आढावा घेणं आहे. तसेच, असे मानले जाते की केंद्राद्वारे गठित टास्क फोर्स मुलींच्या लग्नाच्या वयाचा आढावा घेईल. टास्क फोर्सने मुलींमध्ये उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सूचित केलं आहे.

टास्क फोर्स 31 जुलै रोजी आपला अहवाल सादर करेल. टास्क फोर्समध्ये डॉ. व्ही.के. पॉल, सदस्य (आरोग्य) एनआयटीआय आयोग, उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण, आरोग्य, महिला व बाल विकास सचिव, जया जेटली यांच्याशिवाय शिक्षणतज्ज्ञ नजमा अख्तर, वसुधा कामत आणि दीप्ती शाह यांचा समावेश आहे.

वाचा-कामागारांचे पगार न देणाऱ्या कंपन्यांवर 12 जूनपर्यंत कारवाई करू नका- SC

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होतं की, आई होण्यासाठी योग्य वयाबद्दल महिलांना सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामागे सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे. सध्या मुलींच्या विवाहासाठी किमान वय 18 वर्षे आणि मुलांसाठी 21 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे.

वाचा-'या' ब्लड ग्रुपला कोरोनाचा सर्वात जास्त धोका, डॉक्टरांचा नवा रिसर्च आला समोर

काय आहे प्रकरण

ऑक्टोबर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं घेतलेला निर्णय सरकारच्या या निर्णयाला कारणीभूत आहे. वैवाहिक बलात्कारापासून (marital rape) मुलींचा बचाव करण्यासाठी बालविवाह पूर्णपणे बेकायदेशीर समजले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने लग्नासाठी किमान वय निश्चित करण्याचा निर्णय सरकारवर सोडला होता. दुसरीकडे असे म्हणले जात आहे की जर आई होण्याचे कायदेशीर वय 21 वर्षे निश्चित केले गेले तर एखाद्या महिलेची मुलांना जन्म देण्याची क्षमता आपोआप कमी होईल.

वाचा-PHOTOS: अडीच महिन्यांनंतर सुरू झालं पुणे, बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स उघडली

First published: June 5, 2020, 11:35 AM IST
Tags:

ताज्या बातम्या