Home /News /national /

मोदी सरकारच्या योजनेमुळे लाखो तरुण होतील स्वावलंबी; 15000 कोटींचा दिला निधी

मोदी सरकारच्या योजनेमुळे लाखो तरुण होतील स्वावलंबी; 15000 कोटींचा दिला निधी

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने याबाबत घोषणा केली

    नवी दिल्ली, 25 जून :  बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने व्याज अनुदान योजनेसह 15,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा अनुदानाची घोषणा केली आहे. यामागे खासगी व्यापाऱ्यांना आणि MSME मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे उद्दीष्ट आहे. या पुढाकाराने तरुणांसाठी रोजगाराच्या 35 लाख संधी निर्माण होतील.  हा निधी लॉकडाऊनने बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी मे महिन्यात जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजचा एक भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे वाचा-GOOD NEWS : कोरोना लसीचं अंतिम ट्रायल; यशस्वी झाल्यास याच वर्षात येणार लस खासगी कंपन्यांना व्याजात 3% सूट पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, नवीन पायाभूत सुविधा निधी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा एक भाग आहे. कोविड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे पीडित लोकांना मदत करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, प्रथमच आम्ही खासगी कंपन्यांना दुग्धशाळा, कुक्कुटपालन आणि मांसासाठी प्रक्रिया मूलभूत सुविधा उभारण्यासाठी तीन टक्के व्याज सूट देणार आहोत. लॉकडाऊनमुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहे. अशा आर्थिक अडचणीत त्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान देशभरात कोरोनाचा रिकवरी रेट 57.43 पर्यंत पोहोचला असून यावरुन कोरोना आटोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांत 13,012 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत देशातील 2,71,696 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शिवाय रिकवरी रेटही 57.43 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. रिकवरी रेट वाढत असता तरी कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे समोर येत आहे.    
    First published:

    Tags: Employment, Narendra Modi (Politician)

    पुढील बातम्या