23 मार्च : शहीद जवानांच्या मुलांच्या सर्वच शिक्षणाच्या खर्चाचा भार आता केंद्र सरकार उचलणार आहे. असे संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आतापर्यंत शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार दरमहा दहा हजार रुपयेच खर्च करीत होते या मर्यादेला शैक्षणिक सवलत, असे म्हटले जायचे. पण आता ही मर्यादाच काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे शहीदांच्या भविष्याची चिंता मिटली असं म्हणायला हरकत नाही.
केंद्र सरकारनं दिलेली ही सवलत आता सशस्त्र दलांतील अधिकाऱ्यांची मुले, कारवाई दरम्यान बेपत्ता असलेल्या ऑफिसर रँकच्या खालच्या व्यक्ती आणि जे कारवाईत ठार झाले किंवा अपंग झाले त्यांच्या मुलांना लागू होणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत असताना, शहीद जवानांच्या घरच्यांकडूनही या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: All the expenses for the education, Central government, Martyrs children, केंद्र सरकार, देश, भारत, मुलांचा खर्च, शहीद जवान, शिक्षण