मराठी बातम्या /बातम्या /देश /CCTVचं झाले दिल्ली पोलिसांचे खबरे, केजरीवालांच्या निर्णयाचा पोलिसांना फायदा

CCTVचं झाले दिल्ली पोलिसांचे खबरे, केजरीवालांच्या निर्णयाचा पोलिसांना फायदा

आत्तापर्यंत 1.5 लाख कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर जवळपास तेवढेच कॅमेरे बसविण्याचं काम सुरु आहे.

आत्तापर्यंत 1.5 लाख कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर जवळपास तेवढेच कॅमेरे बसविण्याचं काम सुरु आहे.

आत्तापर्यंत 1.5 लाख कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर जवळपास तेवढेच कॅमेरे बसविण्याचं काम सुरु आहे.

नवी दिल्ली 25 जुलै: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सर्व शहरात CCTV कॅमेऱ्यांचं जाळ उभं केलं आहे. त्यांच्या या निर्णयावर त्यावेळी सर्वच पक्षांनी प्रचंड टीका केली होती. मात्र आता त्या कॅमेऱ्यांचे फायदे दिसून येत आहेत. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) मदतीला CCTV कॅमेऱ्यांचं जाळं येत असून त्यामुळे अनेक गुढ गुन्ह्यांची उकलही होत आहे. एका मुलीचं अपहरणहोत असतांना तिच्या आईने आरोपींचा प्रतिकार केला. ती सर्व घटना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. त्या फुटेजच्या आधारेच आता दिल्ली पोलिसांनी आरोपींना पकडण्यात यश मिळवलं आहे.

हे सीसीटीव्ही कॅमेरेच आता दिल्ली पोलिसांचे खबरे झाले असून त्यामुळे पोलिसांना माहिती आणि थेट गुन्हेगाराचं फुटेज मिळत असल्याने त्यांना मोठा फायदा होत आहे.

सत्तेत आल्यानंतर शहराच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्यांचं जाळ उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता. त्याचं काम सुरु झाल्यावर त्या निर्णयावर प्रचंड टीका झाली होती. दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकारचं सुरक्षा व्यवस्थेवर नियंत्रण राहात नाही. मात्र आता राज्य सरकारचा हा उपक्रमच दिल्ली पोलिसांच्या मदतीला धावून येत आहे.

अपहरण, खून, चोरी, गाड्या चोरण्याच्या घटना, हत्या अशा अनेक प्रकरणांमध्ये आरोपी शोधण्यात पोलिसांना या कॅमेऱ्यांचा मोठा उपयोग झाला आहे. अनेक महत्त्वाची आणि गुढ प्रकरणेही त्यामुळे बाहेर आली आहेत.

सुपरस्टार पवन कल्याणच्या फॅन्सचा राडा, राम गोपाल वर्मांच्या ऑफिसवर दगडफेक

आत्तापर्यंत 1.5 लाख कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर जवळपास तेवढेच कॅमेरे बसविण्याचं काम सुरु आहे. त्याच शिवाय दिल्ली सरकारने त्यांच्या शाळांमध्ये 85,000 हजार कॅमेरे बसविलेले आहेत. या कॅमेऱ्यांचं आत्तपर्यंत 240 प्रकरणांमध्ये फुटेज पोलिसांना देण्यात आल आहे.

‘ज्योतिरादित्य शिंदे म्हणजे नाग’; काँग्रेस नेत्याने नागपंचमीच्या दिल्या शुभेच्छा

या कॅमेऱ्यांचा दर्जा उत्तम असून त्याच्या फुटेजचा दर्जाही चांगला आहे. ज्या लोकांनी या कामात अडथळे आणले त्यांनाच आता या कॅमेऱ्यांचा उपयोग होत असल्याचं आपचे आमदार दिलीप पांडेय यांनी म्हटलं आहे.

First published: