Home /News /national /

PM मोदींसमोर गाणं म्हणणाऱ्या मराठी मुलाची कामराने उडवली खिल्ली, वडिलांचही सडेतोड उत्तर

PM मोदींसमोर गाणं म्हणणाऱ्या मराठी मुलाची कामराने उडवली खिल्ली, वडिलांचही सडेतोड उत्तर

कुणाल कामराच्या ट्विटनंतर मुलाच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

    नवी दिल्ली, 5 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बर्लिन यात्रेदरम्यान त्यांना देशभक्तीचं गीत ऐकवणाऱ्या मुलाच्या वडिलांनी तो व्हिडीओ एडिट करण्यावरुन कॉमेडिअन कुणाल कामरा (Kunal Kamra) याला जबरदस्त सुनावलं आहे. त्यांनी ट्विट करून लिहिलं की, माझ्या मुलाला राजकारणात आणू नका. तुमचे घाणेरडे जोक सुधारण्याचा प्रयत्न करा. मुलाने मोदींसमोर 'हे जन्मभूमि भारत' गाणं गायलं होतं आणि यानंतर पंतप्रधानांनी मुलाचं कौतुक केलं. मुलाचा आणि मोदींचा हा व्हिडीओ एडिट करून कुणाल कामराने ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये जन्मभूमी गाणं हटवून 2010मधील बॉलिवूड चित्रपट पीपली लाइव्हमधील महंगाई डायन हे गाणं लावलं होतं. मात्र मुलाच्या वडिलांच्या प्रतिक्रियेनंतर कामराने ट्विट डिलीट केलं. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही मूळ गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हे ही वाचा-कोण आहेत IAS Nidhi Kesarwani? काय आहे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे प्रकरण? मुख्यमंत्री योगींनी दिलीय स्थगिती कशी होती वडिलांची प्रतिक्रिया? मुलाच्या वडिलांचं नाव गणेश पोळ असून त्यांनी आपल्या ट्विटरवरुन ट्विट केलं आहे. तो माझा 7 वर्षांचा मुलगा आहे. जो आपल्या मातृभूमीसाठी गाणं गात होता. आता तो लहान असला तरी तो आपल्या देशावर तुमच्याहून अधिक प्रेम करतो. लहानग्याला तुमच्या घाणेरड्या राजकारणापासून लांब ठेवा आणि आपले घाणेरडे विनोद दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. कसा होता मोदींचा जर्मनी दौरा.. पीएम मोदी सोमवारी बर्लिनला पोहोचले होते. येथे त्यांनी चान्सलर ओलाफ शूल्जसोबत द्विपक्षीय चर्चा केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Narendra modi, Viral video.

    पुढील बातम्या