Home /News /national /

फेसबुकवरील 'ती' फ्रेंड निघाला 'तो', दिल्लीच्या डॉक्टराला तब्बल 2 कोटींना गंडवलं!

फेसबुकवरील 'ती' फ्रेंड निघाला 'तो', दिल्लीच्या डॉक्टराला तब्बल 2 कोटींना गंडवलं!

 पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात असं आढळलं, की डॉक्टर ज्या व्यक्तीशी तरुणी म्हणून बोलत होते, ती तरुण नसून तरुण होता

पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात असं आढळलं, की डॉक्टर ज्या व्यक्तीशी तरुणी म्हणून बोलत होते, ती तरुण नसून तरुण होता

पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात असं आढळलं, की डॉक्टर ज्या व्यक्तीशी तरुणी म्हणून बोलत होते, ती तरुण नसून तरुण होता

    नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : हनी ट्रॅपच्या (Honey Trap) प्रकरणांबद्दल तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल.  हनी ट्रॅपमध्ये एखाद्या व्यक्तीला कसं अडकवलं जाऊ शकतं आणि त्याची फसवणूक केली जाऊ शकते, याच एक उदाहरण नवी दिल्लीत समोर आलं आहे. एका तरुणाने तरुणी बनून एका डॉक्टराला तब्बल 2 कोटींना गंडा घातला होता. अलीकडे फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून हनी ट्रॅपद्वारे अनेकांना जाळ्यात ओढलं जात आहे आणि फसवणूक केली जात आहे.  नवी दिल्लीत असं एक प्रकरण उघडकीला आलं की, ज्यात एका 44 वर्षांच्या डॉक्टरची दोन कोटी रुपयांहून अधिक मोठी फसवणूक (Online Fraud) झाली. या डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये कसं अडकवलं गेलं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यावरून बाकीच्या व्यक्ती धडा घेतील आणि शहाण्या होतील. Corona Update: भारतात पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक लसीकरण, 24 तासांत नवा विक्रम ज्या डॉक्टरांची फसवणूक झाली, ते दिल्लीतले (Delhi) एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. डॉक्टर महेश (काल्पनिक नाव) यांची फेसबुकवर एका तरुणीशी संपर्क आला. तिने डॉक्टर महेश यांना सांगितलं, की ती एका श्रीमंत कुटुंबातली असून, दुबईत त्यांचा एक मोठा व्यवसायही आहे. त्या दोघांमध्ये अनेक दिवस संवाद होत राहिला. त्या तरुणीचं प्रोफाइल इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडियावरही होतं. त्यामुळे डॉक्टर महेश यांचा तिच्यावर विश्वास बसला. फेसबुक फ्रेंड असलेल्या त्या तरुणीने एके दिवशी डॉक्टरना सांगितलं, की तिच्या बहिणीचं अपहरण झालं आहे. अपहरणकर्त्यांनी तिला सोडण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. आपली फसवणूक होत असल्याची शंकाही डॉक्टर महेश यांना आली नाही. त्यांनी त्या मुलीला मदत करण्यासाठी सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन तिथल्या व्यक्तीकडे दोन कोटी रुपये सोपवले. तो दिवस होता 12 ऑगस्ट. त्यानंतर त्या तरुणीने डॉक्टर महेश यांना धन्यवाद देणारा मेसेज पाठवला आणि आपली बहीण सुरक्षितरीत्या घरी आल्याचंही सांगितलं. नंतर एके दिवशी त्याच तरुणीने त्यांना एक बँक खाते क्रमांक दिला आणि तिथे 7 लाख 20 हजार रुपये भरण्यास सांगितलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, डॉक्टरना अजूनही आपली फसवणूक होत असल्याचा अंदाज आला नाही. त्यांनी ते पैसेही भरले. गाय वाहून गेली पण पोहत आली परत, लोकांनी घातली तोंडात बोटं LIVE VIDEO एकूण दोन कोटी 7 लाख 20 हजार रुपये मिळाल्यानंतर त्या तरुणीने आपला फोन नंबर बंद केला आणि सोशल मीडिया (Social Media) अकाउंट्सही डिलीट करून टाकली. काही दिवस तिचा काहीच पत्ता लागला नाही, तेव्हा डॉक्टरांना फसवणुकीची शंका आली. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात असं आढळलं, की डॉक्टर ज्या व्यक्तीशी तरुणी म्हणून बोलत होते, ती तरुण नसून तरुण होता. तो महाराष्ट्रातल्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातला होता. त्याने आपलं नाव संदेश मानकर असल्याचं सांगितलं आहे. 12वीपर्यंत शिकलेल्या संदेशकडून पोलिसांनी 1.97 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. आता तो सात सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहे. या सगळ्या घटनाक्रमावरून हे पुन्हा एकदा सिद्ध होतं, की ऑनलाइन फसवणुकीचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. शिकलेल्या व्यक्तीही अगदी सहज या जाळ्यात सापडत आहेत. कधी फोनच्या सिमच्या केवायसीच्या नावावर फोन येतो, तर कधी ओएलएक्सच्या माध्यमातून फोन येतो. आपण जागरूक नसलो, तर अगदी सहज फसवणूक होऊ शकते. याबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी न्यूज 18ने एक मालिका चालवली असून, त्याद्वारे अशा फसवणुकीपासून बचाव करण्याचे उपाय सांगितले जात आहेत. फसवणूक टाळण्याचं सूत्र एकच - अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून पैसे देऊ नयेत. आपली खासगी माहिती खासगीच ठेवावी.
    First published:

    Tags: Facebook, Yavatmal

    पुढील बातम्या