मराठी बातम्या /बातम्या /देश /

सख्ख्या बहिणींचे शव बाभळीच्या झाडावर होते लटकलेले, मामा ठरला कारण

सख्ख्या बहिणींचे शव बाभळीच्या झाडावर होते लटकलेले, मामा ठरला कारण

याची माहिती मिळताच ब्रम्हपुरा ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याचा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आली. यामध्ये त्याची बहीण मीरा सिंहने आपलं जबाब नोंदवला आहे.

याची माहिती मिळताच ब्रम्हपुरा ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याचा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आली. यामध्ये त्याची बहीण मीरा सिंहने आपलं जबाब नोंदवला आहे.

या बहिणींच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली आहे त्यातून हा खुलासा झाला

    छत्तीसगड, 16 मार्च : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात सख्ख्या बहिणींना फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ  मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये एका तरुणीने तिच्या मामावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबड उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शनिवारी धमतरी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुरुड पोलीस स्टेशन परिसरातील डाही  गावात शुक्रवारी रात्री सख्ख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली. हे वाचा - कोरोना व्हायरसची दहशत पसरवल्याप्रकरणी चीनच्या अध्यक्षांविरोधात कोर्टात तक्रार पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी तरुणींच्या दूरच्या नात्यातील मामा असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री साडेसहाच्या सुमारास डाही खेड्यातील रहिवासी असलेल्या 21 आणि 23 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी अचानक घरातून गायब झाल्या. उशीरापर्यंत परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. नंतर दोघांचे मृतदेह गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर तलावाच्या काठावरील बाभळीच्या झाडावर लटकलेले आढळले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात पाठविण्यात आले आणि त्यांचा  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी एक सुसाइड नोट जप्त केली आहे. ज्यामध्ये एका मृत तरुणीने दूरच्या मामावर बलात्काराचा आरोप केला आहे. ते म्हणाले की पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे वाचा - 'कोरोना'च्या नावानं पोल्ट्री चालकाचा असाही पब्लिसिटी स्टंट, असं उघडं पडलं पितळ!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sucide

    पुढील बातम्या