Home /News /national /

कोरोना लढ्यासाठी भाजप आमदाराने केली होती मदत; आता म्हणतायेत, पैसे परत करा

कोरोना लढ्यासाठी भाजप आमदाराने केली होती मदत; आता म्हणतायेत, पैसे परत करा

यासाठी आमदारांनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे, यामध्ये ते म्हणतात...

    हरदोई, 27 एप्रिल : देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कोरोनाच्या संकटात अनेक आमदार आणि खासदारांनी आर्थिक मदत केली आहे. मात्र अनेकजण आता ही मदत मागत आहेत. सुरुवातील भाजपचे एमएलसीसह 4 आमदार आणि बसपाचे एक आमदार यांनी पत्र लिहून दिलेल्या पैशांचा उपयोग करण्यास नकार दिला आहे. आता हरदोई जिल्ह्यातील आमदार त्यांनी दिलेले 25 लाख रुपये परत मागत आहेत. या पैशांचा योग्य उपयोग होणार नाही, असं कारण यामागे दिलं जात आहे. पैसे परत दिले जावे कोरोना व्हायरसच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील गोपामऊमधील भाजप आमदार श्याम प्रकाश यांनी आपल्या आमदार खात्यातील निधीतून कोरोना फंडसाठी 25 लाख रुपये दिले आहे. आता ते हे पैसे मागत आहेत. याबाबत त्यांनी हरदोई जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले आहे. मी दिलेल्या पैशांचा योग्य उपयोग होत नसल्याने त्यांच्या आमगार निधीचे पैसे परत करावे, असे त्या पत्रात लिहिले आहे. आता जिल्हा प्रशासन त्रस्त आहे. आमदार श्याम प्रकाश पैसे परत मागत आहेत. मात्र ते कसे द्यावे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. कारण आमदार निधीतील 25 लाख रुपयांतील 60 टक्के रक्कम आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. मात्र या संकटात काही लोकप्रतिनिधींच्या अशा वागणुकीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित-घरी जाताना भावुक झाले तबलिगी; म्हणाले, डॉक्टरांनी आई-बापाप्रमाणे घेतली काळजी भूक नाही, स्वाभिमान मोठा! आदिवासींनी नाकारलं मोफत रेशन; म्हणाले, आधी काम द्या  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या