BJP नेत्याला प्रेयसीसोबत पत्नीने रंगेहात पकडलं, नंतर दोघींमध्ये अशी जुंपली

BJP नेत्याला प्रेयसीसोबत पत्नीने रंगेहात पकडलं, नंतर दोघींमध्ये अशी जुंपली

या दोघी फक्त भांडण करुन थांबल्या नाहीत तर यादरम्यान दोघींमध्ये मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे

  • Share this:

लखनऊ, 1 मार्च : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्याचा घरगुती वाद चवाट्यावर आला आहे. या भाजप नेत्याला त्याच्या पत्नीने एका फ्लॅटमध्ये दुसऱ्या महिलेसोबत पकडल्यानंतर ही घटना समोर आली आहे. आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच पत्नी भयंकर चिडली आणि तिने तेथेच आरडाओरडा सुरू केला. आपल्यासोबत विश्वासघात होत असल्याने पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. 'जनसत्ता'ने दिलेल्या बातमीनुसार लखनऊ भाजप किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्रीकांत त्यागी हे गोमती नगर येथील ग्रीनवूड अपार्टमेंटमधील एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. मात्र त्यांचे कुटुंब इथे राहत नाही. त्यांचे कुटुंबीय हे नोएडा येथे राहतात. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी श्रीकांत यांची पत्नी अनू आपल्या दोन मुलांसह ग्रीनवूड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पोहोचली. मात्र येथे आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच ती संतापली.

अनू जेव्हा फ्लॅटमध्ये पोहोचली तेव्हा एक महिला त्या फ्लॅटमधून बाहेर येत होती. तिला पाहताच अनू भयंकर चिडली. दोन्ही महिलांमध्ये मोठा वाद सुरू झाला. यावेळी अनूची मुलं तिच्यासोबत होती. या दोघी फक्त भांडण करुन थांबल्या नाहीत तर यादरम्यान दोघींमध्ये मारहाण झाल्याचे  सांगण्यात येत आहे. या मारहाणीत दोघी महिलांचे मोबाइल फोन तुटले. याबाबत अनूने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हे वाचा - ज्याला 9 महिने पोटात वाढवलं त्याच्या गळ्यावर फिरवला सुरा, पैशांसाठी केला खेळ

First published: March 1, 2020, 2:24 PM IST

ताज्या बातम्या