कोरोना लशीबाबत केलेल्या दाव्यामुळे भाजप पुरती फसली; विरोधी पक्षांकडून जोरदार टीका

कोरोना लशीबाबत केलेल्या दाव्यामुळे भाजप पुरती फसली; विरोधी पक्षांकडून जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, अद्याप कोरोनाची लस तयार नाही, तर दुसरीकडे बिहार निवडणुकीत भाजपन भलताच दावा केला आहे

  • Share this:

लखनऊ, 22 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात मोफत कोरोना वॅक्सीनच्या वचनावर भाजप पूर्णपणे अडकत असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजवादी पार्टी, काँग्रेस, सीपीआयसह दुसऱ्या दलांनी भाजपवर निशाना साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप कोरोनाचे राजकारण करीत आहे. अखिलेश म्हणाले की, भाजप हे वचन उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील नागरिकांना का देत नाही. तर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, भाजप बिहारमधील जनतेच्या भावनांशी खेळत आहे.

अखिलेश यांनी ट्विट केलं की, 'आज देशाच्या सत्ताधारी भाजपने बिहार निवडणुकीत आपल्या घोषणापत्रात म्हटले आहे की, ते बिहारच्या लोकांसाठी कोरोना लस मोफत उपलब्ध करणार आहे. अशी घोषणा यूपी आणि अन्य राज्यांसाठी काय केली जात नाही.

बिहारमधील लोकांसोबत धोका

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, भाजप देश आणि बिहारच्या लोकांच्या भावनांचा विनोद करीत आहे. आम्ही लाखोंच्या संख्येने बिहारमधील आमच्या भाऊ-बहिणींना कुटुंबासोबत रस्त्यावर पादत्राणांशिवाय चालताना पाहिलं. यावेळी त्यांना खायलाही मिळालं नाही. सुशील मोदी आणि नितीश कुमार म्हणाले की, त्यांना बिहारमध्ये येऊ देणार नाही. सुरजेवाला पुढे म्हणाले की, त्यांनी नोकरी मिळाली नाही. त्यांना अन्नही मिळत नव्हते. मनरेगाच्याअंतर्गत नोकरीही मिळाली नाही. 24 तासांपूर्वी पंतप्रधान म्हणतात की, पुढील दीड वर्षे कोणतीही लस नसेल. जिथे पंतप्रधान मना करत आहेत. तर मग भाजप लस कशी देऊ शकते? बिहारच्या लोकांसोबत हा धोका केला जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 22, 2020, 4:23 PM IST

ताज्या बातम्या