भारतातलं अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम केले आहेत. तर काही नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ता (Road Safety) सुरक्षेसाठी या गोष्टींचं पालन सगळ्यांनी करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. बाईक चालविणाऱ्यांसाठी आणि मागे बसणाऱ्यांसाठी हे नवे नियम असणार आहेत. (New Guidelines for two wheeler) रस्ते वाहतून मंत्रालयाने केलेल्या नव्या नियमानुसार बाईकवर मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला हँड होल्डर असणे गरजेचं आहे. सध्या बहुतेक गाड्यांना अशी सुविधा नसते. त्याच बरोबर दोन्ही बाजून फुटरेस्ट असणेही सक्तीचं करण्यात आलं आहे. बाईकच्या मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत. अनेक अपघात याच गोष्टींमुळे होतात. हे वाचा - GOOD NEWS! कोरोनाचं औषध झालं स्वस्त; फक्त 39 रुपयात मिळणार एक टॅबलेट बाईकवर आता मागे कंटेनरही लावता येणार आहे. त्याची लांबी 550 MM तर रुंदी 510 MM आणि उंची 500 MM पेक्षा जास्त नसावी. अशा प्रकारचं कंटेनर असेल तर मागे बसण्याला परवानगी नाही. त्याचबरोबर 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसविण्याची सूचनाही सरकारने दिली आहे. ही सिस्टिम लावली तर ड्रायव्हरला गाडीच्या हवेची स्थिती योग्य आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. सर्व बाईक निर्मात्या कंपन्यांना या नियमांचं पालन नव्या गाड्या तयार करतांना करावं लागणार आहे.‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे. त्याचा प्रत्यय आला मध्यप्रदेशातल्या टीकमगढमध्ये. भरधाव वेगाने जाणारी बाईक ट्रॅक्टरवर आदळली पण बाईकस्वार थोडक्यात बचावला. त्याचा हा थरारक VIDEO व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/Oq76MsGCNQ
— News18Lokmat (@News18lokmat) July 24, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.