Home /News /national /

दुध प्यावे की नाही? एवढ्या रुपयांनी वाढणार किंमती, अमूलने दिले संकेत

दुध प्यावे की नाही? एवढ्या रुपयांनी वाढणार किंमती, अमूलने दिले संकेत

अमूलच्या दुधाबरोबर त्याच्या इतर उत्पादनातही मोठी वाढ करण्यात येणार आहे

    नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : सर्वसामान्या नागरिकांना पुन्हा एका महागाईचा त्रास सहन करावा लागणार आहे. आपण सर्वांची गरजेची वस्तू म्हणजे दूध. बटर, पनीर आणि दुधाच्या तत्सम पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेली अमूल (Amul) पदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमूलचे कार्यकारी अधिकारी आरएस सोढी यांनी CNBC TV-18 यांना दिलेल्या एका मुलाखतीत ही बाब सांगितली आहे. अमूल दुधाच्या किंमतीत 4 ते 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2019 मध्ये ‘मदर डेयरी’ या कंपनीने विविध प्रकारच्या दुधात ३ रुपये प्रतिलिटर इतकी वाढ केली होती. सध्या अमूल दुधाच्या किंमतीत 4 ते 5 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार असून दुधाच्या वस्तूंच्या किंमतीत 7 ते 8 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांत पिशवीच्या दुधामध्ये केवळ दोन वेळा वाढ करण्यात आल्याची माहिती अमूलकडून देण्यात आली आहे. अमूलचे अनेक पदार्थ जनतेमध्ये प्रसिद्ध आहे. अमूलच्या दुधाबरोबरच अमूलचे दही, अमूलचे ताक, अमूलचे चीज, अमूल आईस्क्रीम आणि अमूलचे बटर आवर्जुन लोकांच्या फ्रिममध्ये आढळून येतं. याच्या किंमती वाढल्याने लोकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सरकारने दूधाचे पदार्थ आणि इतर कृषी उत्पादन एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी कृषी उडान आणि शेतकरी रेल या योजना सुरू केल्या आहेत. कृषी उत्पादनाची वाहतूक व्यवस्था सुधारणे हे सरकारचे प्रमुख ध्येय आहे. बजेट 2020 मध्ये जाहीर केल्यानुसार सरकार मेड इन इंडिया वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आरएस सोढी यांनी सांगितले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amul butter, Milk

    पुढील बातम्या