Home /News /national /

निसर्गाचं रौद्र रूप; गावकरी पलीकडे जातानाच लाकडी पूल गेला वाहून, धक्कादायक Video 

निसर्गाचं रौद्र रूप; गावकरी पलीकडे जातानाच लाकडी पूल गेला वाहून, धक्कादायक Video 

येथे तुफान पावसामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. पुलावरुन चालत असतानाच पुल नदीत वाहून गेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    गुवाहाटी, 16 मे : मान्सूनपूर्वी आसाममध्ये (Assam Flood) पुरामुळे नागरिकांची हालत गंभीर झाली आहे. पुरामुळे तब्बल 222 गावांना याचा फटका सहन करावा लागत आहे. पुरामुळे एका लहान मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकोपामुळे 202 घरांचं नुकसान झालं आहे. या राज्यात साधारण 18 मेपर्यंत अलर्ट जारी करण्यात आलं आहे. आसाममधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुरामुळे लाकडी पूल वाहून गेल्या दिसत आहे. यावेळी गावकरी पुलावर उभे राहून नदी ओलांडत होते. त्याचवेळी पाण्याचा (The bamboo bridge in Jhargaon washed as people were crossing) जोरात प्रवाह आला आणि लाकडी पूल तुटला. यानंतर गावकरी पाण्यात पडले. पाण्याच्या प्रवाहाबरोबरच तेही वाहताना दिसत आहे. ही घटना आसाममध्ये उदयगुरी जिल्ह्यातील कलनंदी येथील आहे. झरगावात पाण्यातून रस्ता क्रॉस करताना लाकडी पूल पाण्यात वाहून गेल्याने गावकरी पाण्यात पडल्याचं दिसून येत आहे. पूरग्र्स्त गावांमध्ये अभियान... पूरग्रस्त गावांमध्ये सैन्य, अर्धसैन्य दल, एसडीआरएफ, आदींकडून बचाव कार्य सुरू आहे. होजई, लखीमपुर आणि नागांव जिल्ह्यात रस्ते, पूल आणि नाले पाण्याने ओसंडून वाहत आहे. शनिवारी सातत्याने पाऊस होत असल्याने दीमा हसाओ जिल्ह्यातील 12 गावांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam, Rain flood, Shocking viral video

    पुढील बातम्या